Contact Banner

धुं धुमार्स ||लेखिका-डॉ अनिता बेंडाळे

 


|| धुं धुमार्स ||लेखिका-डॉ अनिता बेंडाळे

थंडीच्या दिवसात वर्षांच्या सुरवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रात .या सणाला अध्यात्मिक बरोबर शास्त्रीय ही महत्व आहे.या दिवसा आधी रात्र मोठी आणि  दिवस लहान असते.मकर संक्रांतिच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात,या नंतर रात्री लहान व दिवस मोठया  होत जातो. संक्राती नंतर ऋतुबद्दल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढा यला लागते.मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्राती असे म्हटले जाते.

दर महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो.हा काल 12 ते 17 तारखे दरम्यान चा असतो.मात्र या मासिक संक्रातीला विशेष महत्त्व दिले जात नाही.मकर संक्रातीला महत्त्व दिले जाते.कारण मकर संक्रातीपासून कर्क संक्राती पर्यंत च्या काळाला `उत्तरा यन`असे म्हणतात.कर्क संक्राती पासून मकर संक्रांतीपर्यंत च्या काळा ला `दक्षिणायन`अशी संज्ञा आहे.रात्रीपेक्षा दिवस, वद्य पक्षा पेक्षा शुक्ल पक्ष व दक्षिणायनपेक्षा उत्तरायनाला श्रेष्ठ मानले जाते,.कारण त्या काळात `प्रकाश` जास्त असतो व त्याला आपण जास्त शुभ मानतो.15 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात सूर्य धनु राशीत असतो व या कालावधीत च एखाद्या सोई चा दिवस पाहून धुधुमास पूर्वीचे लोक साजरा करीत असत.तो म्हणजे सुर्यद्दयाला चारी ठाव केलेल्या स्वयंपाकाचा नैवद्य सूर्याला व देवांना करायचा व पंक्तीला ब्राह्मण घेऊन भोजन समारंभ करायचा .या स्वयंपाका त मुगाची खिचडी,तीळ,लावून केलेली बाजरीची भाकरी ,गुळाची पोळी ,वांग्याचे भरीत,एखादी भाजी ,चटणी,कोशिंबीर व कढी या गोष्टीचा समावेश असे.

सूर्यदय याला सर्व स्वयंपाकाची सिद्धता व्हावी यासाठी बायका साधारणतः पहाटे 3 || ते 4 च्या दरम्यान उठत . आधी केरवारा, सडा रांगोळी, वेनिफनी आटोपून स्नान करायचे व मग स्वयंपाकला लागायचे. त्यासाठी काही तयारी आदल्या दिवशीच करून ठेवत.ती म्हणजे गुळाच्या पोळी साठी गूळ तयार करणे,चटणी साठी खोबरे किसून ठेवणे, भाज्या चिरून त्यावर ओले फडके झाकून ठेवणे इत्यादी.त्या काळात गॅसच्या शेगड्या नव्हत्या.मिक्सर सारखे साधन नव्हते.तरी बायका  खलबत्या व पाटा वरवंटा किसणी इत्यादी साधनांचा वापर करून सर्व सण यथासांग पद्धतीने सजरे करायच्या  हे विशेष.

संक्रातीला तीळ गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. या मागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरा याचा असे म्हटले जाते,पण या गोष्टीला वैज्ञानिक दृष्टी कोण आहे.तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असते.थंडीत शरीराला उष्णता व स्निग्ध तेचि आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थ चे मह्त्व आहे.हा सण भारता बरोबर आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरा होतो.नेपाळ मध्ये याला माघी किंवा माघी संक्रात ,थायलड मध्ये सोगक्रां न ,ला ओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिग् यान असे म्हटले जाते. भारतात देखील लोहरी,मकर संक्रांती,पोंगल इ. नावे आहेत.या सणाला गुजरात आणि राज स्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखला जातो.यामागे करमणुक होणे हा उद्देश असला तरी पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्यानेच शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात vit D मिळते याने थंड हवेपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त ता मिळते.


डॉ. अनिता बेंडाळे

     7887883303

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.