भुसावळ शहरातील वांजोळा चौफुली ला अंडर पासची मंजुरी.खा रक्षा खडसे च्या प्रयत्नांना यश
भुसावळ शहरातील वांजोळा चौफुली ला अंडर पासची मंजुरी.खा रक्षा खडसे च्या प्रयत्नांना यश bhusawal shahratil vanjolachaufulis under pass chi manjuri
भुसावळ प्रतिनिधी- येथील वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवाय ग्रामस्थ व वांजोळा रोडवरील नागरिकांना नववर्षाची भेट.
चिखली ते तरसोद या मार्गावर नॅशनल हायवे चे चौपदरीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. वांजोळा चौफुली वरून वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवाय ही गावे जोडलेली आहेत. तसेच भुसावळ शहरातील सुमारे ,६ हजाराच्या आसपास वस्ती पसरलेली आहे.
सर्व गावकरी व शहरातील लोक वांजोळा रोडवरुन दररोज एनएच ६ ओलांडून शहरात ये जा। करतात. कारण एनएच-6 भुसावळ शहराचा भाग आहे.
यापूर्वी वांजोळा चौकात बर्याच दुर्घटना घडून लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. भविष्यात भुसावळ शहराचा वेगवान विस्तार लक्षात घेता प्रवाश्यांमध्ये वाढ होईल परिणामी हा चौक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये अचानक वाढ होईल.
वांजोळा चौफुली वर अंडर पास होण्यासाठी वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवायचे सरपंच व शहरातील नगरसेवक यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे निवेदन दिलेले होते. यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता या मागणीला यश मिळून काल न्हाई चे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना मंजुरीचे पत्र पाठवले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत