Contact Banner

शहर पत्रकार संघ अध्यक्षपदी शामकांत पाटील उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिव अनोमदर्शी तायडे


 


शहर पत्रकार संघ अध्यक्षपदी शामकांत पाटील 

उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिव अनोमदर्शी तायडे

सावदा प्रतिनिधी येथील विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे पत्रकार संघाचे सचिव रवींद्र हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत संघाचे सदस्य दिवंगत पत्रकार सुरेश बेंडाळे याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 बैठकीत सावदा पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी   नियुक्ती करण्यात आली.

      सन २०२०-२१ च्या अध्यक्ष  शामकांत वसंत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण रघुनाथ पाटील ,सचिव अनुमोदश्री तायडे तर कोषाध्यक्षपदी पंकज पाटील,संपर्क प्रमुख राजू दिपके, सल्लागार लाला कोष्टी,राजेंद्र भारंबे यांची सर्वांनूमते  बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.त्यांचे स्वागत होत आहे.

या  प्रसंगी  ज्येष्ठ पत्रकार लाला कोष्टी, श्याम पाटील, राजेंद्र भारंबे तसेच प्रवीण पाटील,अनोमदर्शी तायडे सर , रवींद्र हिवरकर,पंकज पाटिल, कमलाकर पाटिल, रोशन वाघुळदे, साजिद शेख़ ,राजेश पाटिल, राजू दिपके,  भारत हिवरे, अज्जु शेख़,पिंटू कुलकर्णी,मिलिंद टोके,मिलिंद कोरे  सदस्य बिनविरोध निवडण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.