शिवसेनेचा प्रयत्नाने दुर्मिळ पक्षी घुबडाला मिळाले जीवनदान
शिवसेनेचा प्रयत्नाने दुर्मिळ पक्षी घुबडाला मिळाले जीवनदान
तुमसर (७जानेवारी) : हनुमान नगर येथील सारंगा टॉकीजच्या आवारासमोरील नारळाच्या उंच झाडावर पतंगाच्या मांज्यावर घुबड अडकलेल्या अवस्थेत दिसून आला यांची माहिती स्थानिक लोकांनी शिवसेनेचे विभाग प्रमुखांना दिल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत सारंगा टॉकीज येथील नारडाच्या उंच झाडावर अडकलेल्या घुबडाला बघून लगेच वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री. गोविंद लुचे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. सदर वनविभागाने आपल्या चमूसह घटनास्थळी तात्काळ येऊन अडकलेल्या घुबडाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातमध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. परंतु, घुबड पतंगीच्या मांज्यावर अडकल्याने तो जखमी अवस्थेत आढळून आले. सदर घुबडाचा पंखाला जखम झाली होती त्यामुळे लगेच घुबडाला पकडून त्याला पाणी पाजून स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, वनपरीक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे, क्षेत्र सहाय्यक टी. एन. कावळे, वन पाल जकास बी. एच. गजभिये, वाहन चालक योगेश लांजेवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत