Header Ads

Header ADS

भुसावळच्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू सिंधी कॉलनीत शोककळा


 

भुसावळच्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू  सिंधी कॉलनीत शोककळा

 भुसावळ प्रतिनिधी । जळगाव येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्यवसाय करणारे दोघे भाऊ काम आटोपून दुचाकीने घरी भुसावळला येत होते . गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील ट्रॅक्टरच्या शो - रूमजवळ भरधाव डंपरला धडकल्याने दोन्ही तरूण भावांचा मृत्यू झाला . हे दोघे भुसावळातील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते . मनीष सुरेशकुमार दरडा आणि रितेश सुरेशकुमार दरडा अशी दोघांची नावे आहेत . 

https://www.lewajagat.com/2021/06/Savdyachya.Shakshi.Sapkar.Hicha.Jagtik.Vikram.html

Bhusavlachya.don.sakhya.bhavancha.apghatat.mrutu.sindhi.colonivar.shokkala

शहरातील सिंधी कॉलनीतील जुन्या प्रायमरी स्कूल जवळील रहिवासी मनीष दरडा ( वय ३० ) आणि रितेश दरडा ( वय २६ ) हे दोघे भाऊ महामार्गावरून दुचाकीने जळगावकडून भुसावळला येत होते . साकेगाव ओलांडल्यावर ट्रॅक्टर शो- रूमच्या समोर दुचाकी व डंपरचा ( क्रमांक जीजे.१२- वाय .८१०६ ) अपघात झाला . त्यात मनीष आणि रितेश या दोन्ही भावांचा मृत्यू झाला . यापैकी मनीषचा घटनास्थळी , तर रितेशचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला . ही माहिती भुसावळात कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली .  दरम्यान , रितेशचा विवाह झाला असून त्यास दोन महिन्यांचा मुलगा आहे , असे सिंधी कॉलनीमधील सूत्रांनी सांगितले . तसेच अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे देखील घटनास्थळी दाखल झाले . मृत दोन्ही भावांचे मृतदेह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले . या घटनेमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.