गोकुळ स्वीट मार्टमधील समोशात पालची शेपटी प्रकृती बिघडल्याने तरुणाला दाखल केले रुग्णालयात
गोकुळ स्वीट मार्टमधील समोशात पालची शेपटी प्रकृती बिघडल्याने तरुणाला दाखल केले रुग्णालयात
Gokul.sweet.mar.tmadhil.samoshat.palchi.shepti
जळगाव प्रतिनिधी- गणेश कॉलनी रस्त्यावरील गोकुळ स्वीट मार्टमध्ये शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गौरव कृष्णा पाटील या तरुणाने घेतलेल्या समोशात चक्क पालची शेपटी आढळून आली . समोसा खात असताना त्याची चव कडवट लागल्याने त्याने समोशात पाहिल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला . त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी दुकानात गोंधळ घातला . दरम्यान , तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
खोटेनगरातील रहिवासी गौरव कृष्णा पाटील ( वय २९ ) हा शंभू भोसले व हरीश भोसले या दोन्ही मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गणेश कॉलनी रस्त्यावरील गोकुळ स्वीट मार्ट येथे गेला होता . या वेळी गौरवच्या दोन्ही मित्रांनी खमंग तर गौरवने
कचोरीची ऑर्डर केली ; मात्र कचोरी नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर गौरवने समोशाची ऑर्डर दिली . समोशात कडवट लागल्याने गौरवने समोसा नीट बघितला . समोसा खाल्ल्यानंतर अचानक कडवटलागल्याने त्याने बघितल्या नंतर त्याला समोशात चक्क पालची शेपटी दिसून आली . त्याने तो समोसा स्वीट मार्टच्या मालकाला दाखवला ; मात्र त्यांनी मिरची आहे असे सांगून लक्ष दिले नाही . यानंतर मात्र गौरवला ३ ते ४ उलट्या झाल्याने त्यात पालच असल्याचे निदर्शनास आले . त्यामुळे गौरवला तत्काळ खासगी रुग्णालयात हलवले दुपारनंतर तरुणाची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले .
पोलिसांनी घटनास्थळी केला पंचानामा
समोशात पाल आढळल्यानंतर गौरवच्या मित्रांनी अन्न व औषध प्रशासनाला फोन लावून माहिती देण्याचा प्रयत्न केला ; गोकुळ स्वीट मार्टमध्ये समोशात पालची शेपटी आढळली आहे .
कोणाशीही संपर्क झाला नाही . त्यामुळे त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली . त्यानंतर पोलिसांनी गोकुळ स्वीट मार्ट येथे येऊन चौकशी केली . तर पोलिस नाईक प्रदीपनाईक यांनी पंचनामा केला . दरम्यान , दुपारी ४ वाजेपर्यंत अन्न व औषध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी तपासणीसाठी आले नव्हते . समोशात पाल सापडल्यानंतर गोकुळ स्वीट मार्ट येथे ग्राहकांनी मालकाला जाब विचारला .
फसवण्याचा नियोजित प्रकार
स्वीट मार्टमध्ये असा प्रकार घडलेला नसून हे सर्व नियोजन बद्ध आहे . तक्रारदार गेल्या काही दिवसांपासून त्रास देत असून आठवड्याभरापूर्वी शिवीगाळ करून गेले होते .
सखाराम चौधरी , गोपाळ स्वीट मार्ट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत