चला उद्योजक होऊ या-कौशल्य विकास विभागामार्फत 18 जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
चला उद्योजक होऊ या-कौशल्य विकास विभागामार्फत 18 जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जळगाव, (जिमाका) दि. 16 - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तलयामार्फत शुक्रवार, दिनांक 18 जुन, 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत ‘चला उद्योजक होऊ या’ (उद्योजकता विकास, इनोव्हेशन व स्टार्ट-अप) या विषयावर ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले असून या मार्गदर्शन सत्रास तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. असे डॉ. राजपाल कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन फेसबुक आणि युटयुबवर करण्यात आले असून यासंबंधीची लिंक
फेसबुक
https://www.facebook.com/MaharashtraSDEED
फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युटयुब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A.
युटयुब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत