पेट्रोलला येणार पर्याय?; स्वस्त इंधनाविषयी नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य!
पेट्रोलला येणार पर्याय?; स्वस्त इंधनाविषयी नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य!
लेवाजगत वृत्त सेवा:-
गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला असणारा सगळ्यात मोठा त्रास हा इंधन दरवाढीचा असतो. पेट्रोलचे दर नेहमीच वाढत जातात म्हणून, सामान्य लोक तक्रार करत असतात. सरकारला याबाबत नेहमीच वेठीस धरले जाते. परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी यावर एक मोठा उपाय सुचवला आहे.याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या इंधनाचे दर हे पेट्रोलपेक्षा जवळजवळ 30 ते 35 रुपयांनी स्वस्त आहेत.
https://www.lewajagat.com/2021/06/%20%20%20%20Falun.dafa.msn.v.sharirasathi.yek.sampurn.sadhana.html
एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, "मी परिवहन मंत्री आहे, मी इंडस्ट्रीला एक आदेश देणार आहे की फक्त पेट्रोल इंजिने असणार नाहीत, फ्लेक्स फ्यूएल इंजिनही असतील, जिथे लोकांकडे पर्याय असेल की ते 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करू शकतील."
त्यांनी सांगितले की येत्या 8 ते 10 दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे आणि फ्लेक्स फ्यूएल इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य केले जाणार आहे. इथेनॉल हे स्वदेशी आणि प्रदूषण न करणारे इंधन असल्याने नागरिक देखील याचे स्वागत करतील अशी आशा व्यक्त होत आहे.
✅ यामुळे इंधनासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी कपात होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत