Header Ads

Header ADS

संपूर्ण गावाला लस देऊन भेंडखळ ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्श

 संपूर्ण गावाला लस देऊन भेंडखळ ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्श


फक्त तालुका जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात  पूर्ण गाव लसीकरण केलेला एकमेव गावं

उरण (सुनिल ठाकूर ):भेंडखळ उरण १३ जून - आज वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व प्रांतानून व माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न  चालू आहेत ,त्यात भेंडखळ गावाच्या ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकून गावाच्या हितासाठी व सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण गावाचे लसीकरण करून कोरोना महामारीच्या या रोगाला हद्दपार पूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
 रविवार दि.१३ तारखे पासून
सुराना हाॕस्पिटल चेंबूर मार्फत या लसीकरणाची सुरवात झाली ,या कार्यक्रमाचे उदघाटन डाॕ. आविनाश यांनी केले तर या कार्यक्रमाला मच्छिंद्र घरत,राम भगत, सूर्यकांत ठाकुर, विजय ठाकुर, आविनाश जाधव, अमोल सावंत ,डाॕ.भोसले, डाँ.वाघ, डाँ. ठाकरे, सुरज ठाकुर, आणि संतोष पवार ,ग्रा. वि. अधिकारी डि.एम तुरे आदि मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी बहुमोल उपस्थिती दाखवून सहकार्य केले 
या अगोदरही भेंडखळ ग्रामपंचायतीने या कोरोना काळात गाव व गावाच्या विकासासाठी व सुरक्षिततेसाठी अथक प्रयत्न व नियोजन केले आहे , सुरूवातीला कोरोना काळात गावातील प्रत्येक माणसाला ५ मास्क १ सेनिटायझर वाटप केले तसेच संपूर्ण गावाचा चोख सुरक्षा बंदोबस्त करून संपूर्ण गाव फवारणी करून घेतले ,तसेच दुसऱ्या टप्प्यातही प्रत्येकी ४ मास्क व हन्डवाॕश वाटप केले तसेच या काळात   बेरोजगार , गरीब लोक यांना धान्य वाटप केले ,या सुविधेचा परप्रांतीयांनाही लाभ झाला ,आता तर   प्रत्येक घराला एक अशी वाफाऱ्याची मशीनही ग्रामपंचायतीने देवू केली .
विशेष म्हणजे या गावाला संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपाल हस्ते २०११ ला निर्मळ ग्राम पुरस्कार  हे बक्षीस  देण्यात आले आहे. 
 भेंडखळ  गावच्या ग्रामपंचायतीचे असे उत्कृष्ट काम पाहता बाकी सर्व गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सगळी कडे बोलले जातेय.
या वेळी सरपंच भाग्यश्री चव्हाण,उपसरपंच लक्ष्मण ठाकुर , ग्रा.पं.सदस्य कृष्णा ठाकुर ,किशोर ठाकुर ,रतन ठाकुर ,सौ.योगिता योगेश  ठाकुर , सौ .सोनाली कौस्तुभ  ठाकुर , सौ .संध्या दिपक  ठाकुर .सौ ,निता लिलेश्वर  ठाकुर ,सौ .सुचिता. चेतन  ठाकुर .सौ ,स्वाती महेंद्र  घरत व सौ . निलम हसुराम भोईर श्री लिलेश्वर ठाकूर .हसुराम भोईर ग्राम विकास अधिकारी श्री डी .एम .तुरे .कर्मचारी सौ .निशा वशेणीकर दीपा माटे .प्रेमा पाटील.वंदना चव्हाण  आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.