शेळगाव बॅरेज करिता 140 कोटी मंजूर-आ शिरीष चौधरी यांचे यश
शेळगाव बॅरेज करिता 140 कोटी मंजूर-आ शिरीष चौधरी यांचे यश
खिरोदा प्रतिनिधी:- शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचेशी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मा.ना.श्री. जयंतराव पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नुकतेच त्यांचे पत्र मिळाले. त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी 2021-22 च्या वार्षिक आखणी मध्ये रू. 140 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे. सदर निधी मुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल असे आमदार कार्यालयाने कळविले आहे.याहनिधीबद्दल आ.चौधरी यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत