तापी नदीत पोहणाऱ्या वर अज्ञात प्राण्याचा हल्ला मगर की पाणमांजर ? वन्यजीव संरक्षण घेतेय शोध
तापी नदीत पोहणाऱ्यावर अज्ञात प्राण्याचा हल्ला मगर की पाणमांजर ?
वन्यजीव संरक्षण घेतेय शोध
भुसावळ प्रतिनिधी-कासवे ( ता.यावल ) शिवारात तापी नदीत पोहणाऱ्या तरुणाचा पकडून एका प्राण्याने त्याला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार सोमवारी ( दि . २१ )रोजी
घडला.तरुणावर हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता ? याचा वन्यजीव संरक्षण संस्थेने शोध सुरू केला आहे . आयुध निर्माणी भुसावळातील रहिवासी लोकेश धनगर ( वय २२ मूळ रा.कासवा ता.यावल ) हा तरुण सोमवारी ( दि .२१ ) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कासवा येथे तापी नदीत पोहायला गेला होता . पोहताना अज्ञात प्राण्याने त्याच्या पायाला चावा घेत पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला . हा प्राणी आकाराने मोठा आणि त्यास कान होते . प्राथमिक अंदाजावरून हा प्राणी मगर असल्याचा लोकेशचा दावा आहे . त्या प्राण्यास दुसऱ्या पायाने झटका देऊन मी जीव वाचवत बाहेर पडल्याचे त्याने सांगितले . दरम्यान , या घटने विषयी बोलताना जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे यांनी जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही नदीत मगरीचे अस्तित्व अद्याप सिद्ध झाले नाही . तरुणाने सांगितलेल्या वर्णनानुसार तो प्राणी पाणमांजर असू शकतो . पण , एखाद्याला पाण्यात ओढून नेईल , असा प्रयत्न पाणमांजर करु शकत नाही . कारण तो कमालीचा भित्रा प्राणी आहे . तरीही आम्ही माहिती घेत असल्याचे देवरे म्हणाले ,
कारण जाणून घेतोय
https://www.lewajagat.com/2021/06/Adivasi.Bandvana.Milal.Jivan%20avashyak.saman.html
पाण्यातील एखाद्या काटेरी झुडपात किंवा तत्सम वस्तूत देखील पाय अडकू शकतो . जखम होऊ शकते . नेमके कारण जाणून घेण्यासाठी पाटबंधारे विभाग , वन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा करून शोध घ्यावा लागेल , असे वन्यजीव सरंक्षण संस्थेचे सतीश कांबळे यांनी सांगितले .
संदर्भ:-दिव्यमराठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत