Header Ads

Header ADS

फुलगावजवळील अपघातात वडील ठार , तर मुलगा जखमी


 

फुलगावजवळील अपघातात वडील ठार , तर मुलगा जखमी 

वरणगाव प्रतिनिधी -फुलगाव ( ता.भुसावळ ) जवळील अपघातांची मालिका सातत्याने सुरूच आहे . मंगळवारी ( दि .१५ ) पुन्हा अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वडील ठार , तर मुलगा किरकोळ जखमी झाला . नव्याने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाला समांतर रस्ता नसल्याने तेथे अपघात वाढले आहेत . मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नेर शाहापूर ( जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश ) येथील रहिवासी नामदेव हरि प्रजापती (कुंभार) आणि त्यांचा मुलगा रामकृष्ण नामदेव प्रजापती (कुंभार) हे त्यांच्या शेतात हतनूर धरणाची माती टाकल्याने जेसीबी मशिनवाल्यास पैसे देण्यासाठी जाडगाव येथे दुचाकीने ( क्रमांक एमपी .१२ - एमएच .३९३६ ) गेले होते . तेथे पैसे दिल्यानंतर ते फुलगाव येथे नातेवाईकाच्या भेटीसाठी गेले होते . मात्र , घरी परत जाण्यासाठी निघाल्यानंतर रेल्वे उड्डाणपुलाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली . त्यात वडील व मुलगा दुचाकीच्या खाली फेकल्या गेल्याने जखमी झाले . त्यांना तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले . मात्र , डॉक्टरांनी नामदेव प्रजापती यांना मृत घोषित केले , तर रामकृष्ण प्रजापती हे किरकोळ जखमी झाले . याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात रामकृष्ण प्रजापती यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला . तपास हवालदार नावेदअली पठाण हे करत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.