Header Ads

Header ADS

खरा हिरो -लेखक राजेंद्र चौधरी रोझोदा.

 


खरा हिरो -लेखक राजेंद्र चौधरी रोझोदा.


दारु म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा आहे

हे आता सर्वांनीच मान्य केले आहे

मग दारुड्याला बेवडा म्हणणे

तरी कितपत योग्य आहे ?

तो तर देशाच्या उत्पन्नाचा

खरा हिरो आहे.


तरी ही समाजात दारु पिणा-यांचा

तिरस्कार केला जात आहे

समाजाकडून सन्मानाची वागणूक

मिळण्याची त्यांनाही आशा आहे

एका बाटली मागे पंचवीस - तीस रुपये

जादा द्यायलाही ते तयार आहे

सरकारच्या तिजोरीत आपला पैसा 

जमा होणार हे त्यांनाही माहीत आहे.


मग तुमचा तरी दारु विक्रीला

आता विरोध का होत आहे?

आतातर वाईन दुकानात खुलेआम 

विक्रीला शासन मान्यता देणार आहे

कारण शासनाला आज पैशांची

नितांत गरज आहे

अन् या दारुड्यांमुळे तर देशाच्या

अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे.


तुम्ही कितीही केला विरोध तरी

येथे विजय दारुड्यांचाच होणार आहे

कारण या दारुड्यांमुळेच

सरकारला मोठा आधार मिळत आहे

निवडणूकीत तिच्याचमुळे तर

प्रचाराला खरा रंग येत आहे

दारु विकणारा हा त्यांचा परमेश्वर आहे

तर सरकार त्यांचे माय-बाप आहे.


सरकारकडून परवाना घेऊन

ते दारु विकत आहे

अन् दारु पिण्यासाठी सुध्दा

सरकारच परवाना देत आहे

मग त्या दारुला तुमचा

विरोध तरी का आहे?


दारुत पारदर्शक व्यवहार आहे

इतर भ्रष्टाचारांकडे तुमचा

मात्र कानाडोळा होत आहे

पैसा हे साधन असले तरी

दारु मात्र दारुड्यांचा श्वास आहे

दवापेक्षा आज दारुला मोठा मान आहे.


       *राजेंद्र चौधरी.रोझोदा.ता.रावेर.*

       *मो.९४२३४७२७६५*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.