Contact Banner

महावितरण कंपनीची धडक कारवाई,९० ठिकाणी अकोडे जप्त

 महावितरण कंपनीची धडक कारवाई ,९० ठिकाणी अकोडे जप्त

रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे बहाद्दरांचे धाबे दणाणले

प्रतिनिधी सावदा -

रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर आज दिनांक २४ रोज सोमवारी महावितरण कंपनीने धडक कारवाई केली आहे. 

     मागील काही दिवसांपासुन रणगाव व गहुखेडा गावात वारंवार फ्युज उडणे, अतिभारमुळे तार तुटणे, ह्या मुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होता.व ह्या मुळे तक्रारीमध्ये वाढ झाली होती.  

म्हणून आज सोमवार रोजी सावदा विभागातील कार्यकारी अभियंता  गोरक्षनाथ सपकाळे   व उपकार्यकारी अभियंता  राजेश नेमाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता श योगेश चौधरी, विशाल किनगे, कनिष्ठ अभियंता  मंगेश यादव,  सचिन गुळवे , मुख्य तंत्रज्ञ  जुम्मा तडवी , प्रधान तंत्रज्ञ पवन चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल पाटील,विजय पाटील, पराग चौधरी, दीपक भास्कर यांचे पथकाने  रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली आहे.

सदरील कारवाईत तब्बल ९० वीजचोरीचे आकोडे काढण्यात आले असून दोन्ही गाव आकोडे मुक्त करण्यात आलेले आहे. 

    अशी कारवाई ह्या पुढे ही निरंतर सुरु राहीन अशी माहिती थोरगव्हान कक्षाचे सहाय्यक अभियंता  योगेश चौधरी यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.