Contact Banner

तारापूर एमआयडीसीतील मैदान वाचवण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आमदार राजेश पाटील याचे समावेत घेतली उद्योगमंत्र्यांची भेट


 तारापूर एमआयडीसीतील मैदान वाचवण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आमदार राजेश पाटील याचे समावेत घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

   बोईसर प्रतिनिधी:- येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्र. ओ.एस. 46/2 धारण करणारा भूखंड हा आज रोजी खेळाच्या मैदानासाठी प्रस्तावित आहे.  सदरचा भूखंड हा 51 हजार 319 चौ. मी. होता,  सन 2010 व 2015 मध्ये सुध्दा हा भूखंड डी डेकोर कंपनीला एमआयडीसी मार्फत विक्री केला होता. त्याविरोधात खैरापाडा, बोईसर, सरावली आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी, अनेक सामाजिक संस्थांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी मोठे जनआंदोलन उभे केले होते. त्याचे फळीत म्हणून 34319 चौ. मि. इतके क्षेत्र डी डेकोर कंपनीला देवून उर्वरित 17000 चौ. मि. क्षेत्र मैदानासाठी आरक्षित केले होते, विशेष म्हणजे तेव्हाही उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई साहेबच होते. त्यांनीच जन भावनेचा आदर करून मैदान आरक्षणाचे आदेश दिले होते.  मात्र पुन्हा मैदानासाठी आरक्षित भूखंड  डी डेकोर कंपनीला एम.आय.डी.सी. मार्फत विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरामध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.             


    सदर भूखंड हा बोईसर परिसराचा आत्मा आहे. प्रदूषणाच्या सर्व हद्दी पार केलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील मोकळा श्वास घेण्यासाठी हे एकमेव मैदान शिल्लक आहे. येथे रोज हजारो तरूण खेळांच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ राखत आहेत. असे असताना येथील भुमीपुत्राच्या भावनांचा कोणताही विचार न करता सदर भूखंड डी डेकोर कंपनीला विक्री केला आहे. सदर भूखंडावरील मैदान वाचविण्यासाठी परिसरातील सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आज सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आमदार श्री. राजेश पाटील यांचे समावेत उद्योगमंत्री मा. ना. श्री. सुभाष देसाई यांची भेट घेतली चर्चेच्या दरम्यान एमआयडीसीचे अधिकारी मंत्री महोदयांना चुकीची माहीती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा आमदार महोदयांनी मंत्रीमहोदयासमोर अधिका-यांची कानउघाडणी केली. लवकरच एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बरोबर बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.


   वशिष्टमंडळात आदिवासी एकता परिषद- भुमीसेनेचे श्री. काळूराम काका धोदडे,  जि.प. पालघर बांधकाम सभापती सौ. शितलताई धोडी,  शिवसेनेचे श्री. कुंदन संखे, श्री. निलम संखे, श्री. मुकेश पाटील, भाजपचे श्री. अशोक वडे, श्री. प्रशांत संखे, बहुजन विकास आघाडीचे अॅड.  श्री. नितीन भोईर,  खैरेपाडा ग्रामपंचायत सरपंच सौ. भावना धोडी, उपसरपंच श्री. हितेश संखे,  मा. उपसरपंच श्री. विवेक वडे, आरपीआय चे श्री. सचिन लोखंडे, पत्रकार श्री. मोहन म्हात्रे आणि ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.