Header Ads

Header ADS

उष:पान-डॉ सुशांत पाटील

 


उष:पान-डॉ सुशांत पाटील

 आजकाल पाणी पिणे ही गरज कमी आणि फॅशन जास्त झालेली आहे . लोक शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. 

  का ? 

  कारण ऐकले आहे की जास्त पाणी पिल्याने 

   1 त्वचा सुंदर आणि नितळ बनते .

    2 मुतखडे होत नाहीत .

    3 पोट साफ रहाते .

    4 आळस जाऊन शरीरात स्फूर्ती येते . 

पण वास्तविकता ही आहे की संतुलित मात्रेतच पाणी पिल्याने वरील फायदे होतात , जास्त मात्रेत पिल्याने नाही . सामान्य लोकांत अनेक वर्षांपासून पाणी पिण्यासंबंधी एक प्रवृत्ती दिसते तिला उष:पान (hydrotherapy) असे म्हणतात , आणि हे सर्व आयुर्वेदाने सांगितले आहे असे सांगून खपविले सुद्धा जाते . सत्य हे आहे की आयुर्वेदात असे उष:पान कधी कुठे सांगितलेले च नाही .


मग ही उष:पान (Hydrotherapy)नेमके काय आहे ?

वस्तुतः जिला उष:पान अथवा hydrotherapy चे नाव देऊन प्रचारात आणले गेले ते निसर्गोपचार चा एक भाग आहे आयुर्वेदाचा नव्हे . तथाकथित उष:पान करणारी मंडळी सकाळी सकाळी उठल्यावर बिना दात घासता 1 ते 3 लिटर पाणी थंड असताना देखील पिउन जातात, ज्या मुळे त्यांचे पोट साफ होते असाही त्यांचा गैरसमज असतो . यथार्थ स्वरूपात कचरा भरलेल्या नालीत भरपूर पाणी टाकल्यास कचरा वाहून जातो आणि नाली साफ होते . या संकल्पनेचे आयुर्वेदात यत्किंचितही समर्थन केले नाही. असे करत राहिल्याने काही वर्षात पाचकाग्नी मंद होत जातो . हा च मंद झालेला पाचकाग्नि पोटात अभिष्यंद उत्पन्न करतो , जे पुढे जाऊन अनेक व्याधींचे कारण बनते . 

उष:पान च्या रुपात काही लोक सकाळी लिंबूपाणी, लिंबू अद्रक काढा , दुधी भोपळा रस , कोरफडीचा रस , कारल्याचा रस , बिट चा रस , लिंबाच्या पानांचा रस , गव्हांकुर रस  , गरम पाणी लिंबू आणि मध अश्या पेयांचा आयुर्वेद नावाखाली वापर करतात . वास्तविकता ही आहे यांचा आयुर्वेद संबंध कुठेही वर्णित नाही . माणूस सदैव दीर्घायु आणि स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदात दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे वर्णन आहे . परंतु त्यातही अश्या पेयांचे वर्णन कुठल्याच ग्रंथात केलेले नाही . 

    स्पष्टपणे सांगायचे झाल्यास आयुर्वेदात कुठेही उष:पान करण्याचा उल्लेख नाही . तरीसुद्धा काही चल (Running Reference) संदर्भ रुपात आचार्यांनी एक दोन जागी आपली मते मांडलेली आहेत . आयुर्वेदात प्रात:कालीन निरन्न जलपानास वयस्थापन म्हटलेले आहे , अर्थात वार्धक्य थांबविणारे , जे युवावस्था स्थिर ठेवून शरीरास निरोगी ठेवत आयुष्याला अकाल नष्ट होण्यापासून वाचविते . परंतु ही मात्रा व्यक्तीविशेष ला तितकी च हवी जितकी त्याला तहान लागलेली आहे आणि शिवाय तहान लागलेली असेल तर च हे करावे असाही उल्लेख आहे . जोर जबरदस्ती करून तांब्याभर पाणी पोटात टाकून या गुणांचा लाभ होत नाही . उलट असे केल्यास देखील व्याधी उत्पन्न होतात . 


   मलावष्ठंभ असणारे लोक सकाळी सकाळी 1 2 लिटर थंड पाणी पितात पण जर त्यांनी सकाळी तहान असेल तर आणि जितकी तहान आहे तितके कोमट पाणी पिल्यास या समस्येवर निराकरण होते . यासाठी च ऐकलेल्या तसेच कुठेही लेख म्हणून वाचलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा रजिस्टर आयुर्वेद डॉक्टर (वैद्य) यांना भेटून शास्त्रीय उल्लेख जाणून घ्यावेत , आयुर्वेदातील दिनचर्या ऋतुचर्या यांचे पालन करावे . 


डॉ. सुशांत शशिकांत पाटील 

आयुर्वेदाचार्य :।

BAMS

फैजपूर 

(दर गुरुवारी रावेर येथे , दर रविवारी सावदा येथे )

9860431004

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.