Header Ads

Header ADS

मंदिरातून घरी परतणाऱ्या महिलेस ट्रकने चिरडले



 मंदिरातून घरी परतणाऱ्या महिलेस ट्रकने चिरडले

लेवाजगत न्यूज- भुसावळ- शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील महादेव मंदिरातून दर्शन घेवून घराकडे निघालेल्या ५५ वर्षीय महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ट्रकचे पुढील व मागील टायर अंगावरून गेल्याने मृतदेहाचा चंदामेंदा झाला. या अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकास शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, रविवारीच पत्नीने 'मी सौभाग्यवती मरेल. तुमच्या खांद्यावर जाईल' असे पतीला सांगितले होते. ती आजच सोडून गेल्याचे सांगत आजारपणामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या पतीने हंबरडा फोडला.

     शहरातील मेथाजी मळा भागातील रहिवासी मीना मोहनलाल अग्रवाल (वय ५५) या सोमवारी सकाळी नित्यनेमाने घरून देवदर्शनासाठी निघाल्या. म्युनिसिपल पार्क भागातील राममंदिर, जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेवून त्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील महादेव मंदिरात पोहोचल्या. तेथे महादेवाचे दर्शन घेवून घरी परत जाताना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयसमोर मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक  जेके.२१-००४५) त्यांना मागून घडक दिली. वेगवान ट्रकचे पुढील व मागील टायरही अग्रवाल त्यांच्या अंगावरुन गेले. यामुळे शरीराचा चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर  चालक यशपाल बेलीराम (रा.चाक, सोनखा, जि. सांभा, शहर जम्मू कश्मीर) हा ट्रक सोडून  पसार झाला. शहर पोलिसांनी त्याला अटक करत ट्रकही ताब्यात घेतला.

     अपघातानंतर जळगाव रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर  गर्दी जमली. नागरिकांनी मदतकार्य करत रस्त्यावर पडलेला मीना अग्रवाल यांचा मृतेदह शवविच्छेदनासाठी रवाना केला.

 पोलिसांत ट्रक चालक बेलिरामविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पश्चात पती, मुलगा व विवाहित मूलगी कोमल असा परिवार आहे. दरम्यान

     मृत महिलेचे पती आजारी असून बेडवर आहेत. त्यांना मृत मीना यांनी 'मी सौभाग्यवती मरेल. मला तुमच्या खांद्यावरच पोहोचवा' असे रविवारी सांगितले होते. यानंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत पतीने हंबरडा फोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.