Contact Banner

खा राजेंद्र गावितांना १ वर्षाचा कारावास व १.७५ कोटींचा दंड.

 


खा राजेंद्र गावितांना १ वर्षाचा कारावास व १.७५ कोटींचा दंड.

वृत्तसंस्था पालघर: दि. १४, चेक बाऊंन्स प्रकरणी पालघर जिल्हा शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर न्यायालयाने त्यांना १ वर्षाचा कारावास आणि १ कोटी ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील नेते व मंत्री बच्चू कडू यांच्यानंतर आता पालघरचे शिवसेनेचे खासदार अडचणीत आले आहेत.


महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना ही पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच सोबत एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


पालघरचे रहिवाशी असलेल्या चिराग बाफना यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात २०१७ मध्ये एका जमिनीच्या व्यवहारात धोखा दिल्या प्रकरणी केस नं. ३१३/२०२० नुसार पालघर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जमीन व्यवहार प्रकरणात धोखाधडी केल्या प्रकरणी दावा दाखल केला होता.


आज न्यायालयात या प्रकरणा वरील सुनावणी दरम्यान हा आदेश देत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना १ वर्ष कारावास आणि १.७५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यासंदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना या निर्णयाविरोधात अपिल दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.