पिंप्राळा भागात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात,
पिंप्राळा भागात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात,
वृत्त संस्था जळगाव- पिंप्राळ्यातील विजयनगरात २६ वर्षीय विवाहितेने बुधवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. पल्लवी पाटील पाटील (वय २६) असे विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह राहत होत्या. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केटमधील जळगाव पीपल्स बँकेत लिपिक आहेत. पल्लवी राहत्या घरात खासगी शाळा सुरू करून उदरनिर्वाह करत होत्या. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पती महेश पाटील हे कामावर निघून गेले.
दरम्यान, पल्लवी यांनी घराच्या मागच्या रूममध्ये रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ही घटना उघडकीस येताच त्यांच्या सासू-सासऱ्यांना धक्का बसला.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांसह नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण करीत आहे. पल्लवी यांच्या पश्चात पती महेश पाटील, सासू अंजनाबाई, सासरे हेमलाल पाटील आणि पाच वर्षाची मुलगी उर्वशी असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत