Header Ads

Header ADS

भोंगऱ्या बाजारात नृत्याचे पहिले बक्षीस सतपिंप्रीला आदिवासी परंपरा व संस्कृती जपावी टिकावी या करिता आदिवासींसाठी बक्षीस योजना

 


भोंगऱ्या बाजारात नृत्याचे पहिले बक्षीस सतपिंप्रीला

आदिवासी परंपरा  व संस्कृती जपावी टिकावी या करिता  आदिवासींसाठी बक्षीस योजना 


 शाम पाटील प्रतिनिधी सावदा- भोगऱ्या  उत्सवानिमित्त आज सातपुड्याच्या कुशीत असलेल्या पाल या गावात भोगऱ्या बाजार भरला,या परंपरागत जुन्या बाजारपेठेत आज परिसरातील गाव खेड्यातून वाड्यातून आलेल्या ढोल, ताट  भोंगर्‍या बाजार निमित्त नृत्य करणाऱ्या पथकास सातपुडा विकास संस्था व माजी सरपंच तडवी कामील ग्रुप यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय ही परंपरा कायम टिकावी म्हणून देण्यात आले.यावेळी सर्व प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.यावेळी सातपुडा विकास संस्थेचे सचिव अजित पाटील, माजी सरपंच कामील तडवी, उपसरपंच राजू पाटील, महाजन सर ,पिंटू महाजन इत्यादी नागरिक व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित सह आदिवासी पुरुष,महिला,युवक उपस्थित होते.

      सातपुडा पर्वत रांगेत बसलेल्या पाल ही आदिवासी ची जुनी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत सर्वसमावेशक आदिवासी जातीचे लोक रहातात असतात व बाजारा निमित्त येत असतात आदिवासी पावरा जातीचे लोक होळी आधी जो बाजार भरतो त्याला भोंगर्‍या बाजार म्हणतात ,या बाजारात सर्व आनंदाचे नाच करीत येतात. या दिवसांमध्ये धान्य घरात आलेले असते व धान्य घरात आलेले असून त्या विक्रीतून पैसा हातात आलेला असतो. त्यामुळे हा सण उत्साहात साजरा करता येतो घरातील ढोल-ताशा घरातील वेगवेगळे साहित्य वाजवून नृत्य करून हा उत्सव आदिवासी लोक साजरा करीत असतात ही आदिवासी संस्कृती जपण्यासाठी या पाल गावात बक्षीस योजना ठेवण्यात आली होती मधुकरराव चौधरी यांच्या आजोबांनी मदत करून वसलेलं हे गाव आज आमदार शिरीष दादा चौधरी चालवीत आहे.   असे मत अजित पाटील यांनी व्यक्त केले.

    माजी सरपंच कामील तडवी यांनी सांगितले की आदिवासी भोंगऱ्या चे लुप्त होत चाललेली परंपरा व उत्साह व संस्कृती टिकून रहावी यासाठी आम्ही प्रत्येक परिसरातून येणाऱ्या गाव, वाड्या वस्ती येथून नृत्य ढोल पथकास बक्षीस देण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात प्रथम द्वितीय तृतीय अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते आज वाटप करण्यात आली व ही संस्कृती टिकावी म्हणून प्रयत्न करण्याचे यापुढेही सुरू राहील असे उपस्थित आदिवासींना आश्वासन दिले.यावेळी हर्ष उल्हासात आदिवासींनी ढोल वाजवून व नाच नृत्य करून आदिवासींचे संस्कृतीचे दर्शन घडविले.

  आज या भोगऱ्या बाजारात पूजेची साहित्य बरोबर खाऊ,होळी पूजेस लागणाऱ्या हाहित्याची मोठी विक्री उलाढाल झाली.गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला हा बाजार असल्याने गर्दी झाली होती.


    यांना मिळाली बक्षिसे

प्रथम क्रमांक सतपिंप्री

द्वितीय क्रमांक गाडग्याम

तृतीय क्रमांक गारबर्डी (वनचा फडा) इतर उतेजनार्थ बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी दुपारी २वाजता देण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.