Header Ads

Header ADS

खुर्चीत आढळला महिलेचा जळालेला मृतदेह भावाने व्यक्त केला घातपाताचा संशय ; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 खुर्चीत आढळला महिलेचा जळालेला मृतदेह 

भावाने व्यक्त केला घातपाताचा संशय ; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

लेवाजगत न्यूज जळगाव:- प्लास्टिकच्या खुर्चीत बसलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आगीमुळे खुर्ची वितळली होती. सायंकाळी बुधवारी सहा वाजता अनुराग स्टेट बँक कॉलनीत ही घटना उघडकीस आली.

       घातपात झाल्याचा संशय महिलेच्या भावाने व्यक्त केला जयश्री बळवंत नेरे ( वय ५३ , रा अनुराग स्टेट बँक कॉलनी ) असे मृत महिलेचे नाव आहे. जयश्री यांचे भाऊ सुजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार , २५ वर्षांपूर्वी जयश्री यांचे लग्न जिल्हा नियोजन कार्यालयात नोकरीस असलेले बळवंत पंडितराव नेरे यांच्याशी झाले. मूलबाळ होत नसल्याने नेरे दांपत्यात वाद सुरू झाले होते. अशातच बळवंत नेरे यांनी १५ वर्षांपूर्वी भारती रघुनाथ भांडारकर यांच्याशी लग्न केले. 

       या लग्नास आमचा नकार असताना त्यांनी वारस पाहिजे असल्याचे सांगत बेकायदेशीरपणे हे लग्न केले. या तणावामुळे जयश्री यांची मानसिक स्थिती खराब झाली. त्यांच्यावर ४ वर्षांपासून औषधोपचार सुरू होता. मधल्या काळात नेरे यांना दुसरी पत्नी भारती यांच्याकडून मुलगी झाली. यानंतर दोघेजण जयश्री यांचा छळ करीत होते. जयश्री यांनी माहेरी निघून जावे म्हणून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. १० दिवसांपूर्वी जयश्री ह्या गजानन महाराज मंदिरात भाऊ सुजीत जाधव यांना भेटल्या या वेळी त्यांनी पती व भारती यांच्याकडून होत असलेला त्रास सांगितला . सुजीत यांनी त्यांच्या घरी जाऊन सर्वांची समजूत काढली होती. 

      २ मार्च रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास जयश्री यांचा जळालेल्या अवस्थेतमृतदेह घरातील प्लास्टिकच्या खुर्चीत आढळून आला. जयश्री यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली , अशी माहिती पती बळवंत नेरे यांनी मेहुणे सुजीत यांना दिली. तसेच मृतदेह जीएमसीत आणून ठेवला. मृतदेहाची अवस्था पाहुन सुजीत यांना संशय आला. त्यांनी मेहुणे नेरे यांना विचारणा केली. ' मी पेन्शनच्या कामासाठी कार्यालयात गेलो होतो तर भारती मुलीसह तीच्या आईला भेटण्यासाठी माहेरी गेली होती ' असे उत्तर नेरे यांनी दिले. हा सर्व प्रकार संशयास्पद असून नेरेंसह त्यांची दुसरी पत्नी भारती भारतीचा भाऊ जगदीश भांडारकर यांनी बहिण जयश्रीला जाळून मारल्याचा आरोप सुजीत यांनी केला. संबंधितांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशीच मागणी सुजीत यांनी केली.खुर्चीत बसलेल्या अवस्थेत जीव कसा सोडला ? जयश्री यांच्या अंगावरील साडी पूर्णपणे जळालेली नाही ; पण प्लास्टिकची खुर्ची वितळलेली आहे . अंगावरील काही कपडे नंतर परिधान केल्याचे दिसून येते आहे . जयश्री यांना बांधून ठेवून जाळले असावे . पेटत असताना त्यांनी प्रतिकार , आक्रोश का केला नाही ? खुर्चीत बसलेल्या अवस्थेत जीव कसा सोडला ? हे प्रश्न सुजीत यांनी पोलिस प्रशासनास विचारले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.