Header Ads

Header ADS

प्रतिकूल परिस्थितीत हळदी चे घेतले विक्रमी उत्पन्न केळी पट्ट्यात तरूण शेतकऱ्यांची पर्यायी पिक उत्पन्नाची गगन भरारी

 


प्रतिकूल परिस्थितीत हळदी चे घेतले विक्रमी उत्पन्न

 केळी पट्ट्यात तरूण शेतकऱ्यांची पर्यायी पिक उत्पन्नाची गगन भरारी

लेवाजगत न्यूज सावदा-केळी पट्टा म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या चिनावल व परिसरात गेल्या काही वर्षांपासून केळी  ला पर्याय म्हणून  हळद व आले चे उत्पादन घेऊ लागले आहे, मात्र हे पिक घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी ना तोंड द्यावे लागते यंदा ही हळद पिका ला अतिवृष्टी मुळे पाहिजे तसे पोषक वातावरण नसतानाही चिनावल येथील तरुण शेतकरी राहुल सुरेश नारखेडे यांनी आधुनिक शेती प्रयोग करीत सरसकट  एकरी १९० ते १९५ क्विटल असे हळदी चे विक्रमी उत्पादन घेतल्याने संपूर्ण रावेर यावल परिसरातील शेतकऱ्यान मध्ये चर्चा होत तरुण शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.

     साधारणतः  सन १९च्या  मे महिन्यात टिश्यू रोपं लागवड आधी एकरी   १० ट्रॅक्टर शेण खत आणि एकरी २० ट्रॅक्टर माती टाकली होती मात्र ऐन हे रोप कापणी वर आली त्याच वेळी देशभरात कोरोना मोठ्या प्रमाणात असल्याने ह्या मालाला २०० ते २५० रू भाव मिळाला व फार नुकसान सोसावे लागले होते,म्हणून या तरुण शेतकऱ्यांने या रोपांचा पिल     बाग उत्पन्न येण्याच्या आशेने ठेवला. तरीसुद्धा कोरोना च्या दुसऱ्या लाट मुळे या ही बागांचे उत्पन्न पाहिजे तसे मिळाले नाही.  शेतकरी राहुल नारखेडे यांनी पिल बाग झाले नंतर हॅरो  करुन डबल नांगरणी व डबल रोटर मारुन त्यात सऱ्या काढत त्यानी२०२१  च्या  १ ८ मे ला सव्वा चार एकरात शेलम जाती च्या हळदी ची लागवड केली एकरी १० क्विटल बेणे घेत   ते ४० दिवस सावलीत ( थंड जागी ) ठेवले वर हळदी बेणे ला फुटवे ( कोंब ) आल्यानंतर लागवडीसाठी आधी ह्युमिक पावडर आणि बुरशी नाशक मध्ये भिजवली  या नंतर काढलेल्या सरी मध्ये हळदीची लागवड केली हळदीचे चांगले उत्पादन येण्यासाठी चांगली तंत्रशुद्ध ,अभ्यास युक्त व कृषी तज्ञा च्या मार्गदर्शनाने यात आंतरमशागत करून ३ वेळेस पावर ट्रिलर च्या साहाय्याने हळदी च्या रोपाशी माती लावली आणि  वेळोवेळी खुरपणी केली व खतांचे डोस देताना प्रथम भटृटी ( डेपो ) करून त्या साठी ४ . २५ एकर साठी कुजलेले २ ट्रॅक्टर शेणखत तसेच वृंदावन कंपनी चे २० बॅगखत व कृभको  २० बॅग कंपोस्ट खत आणि डि.ए.पी.८ बॅग , मायक्रो न्यू ट्रेन्ट असे पहीला टप्पा डोस दिला व दुसऱ्या टप्प्यात वरील सर्व खते घेत केवळ डि.ए.पी . ऐवजी १०: २६: २६ वापरले या खतांच्या व्यतिरिक्त नियमित यूरीया ,पोटॅश व मायक्रो न्यूट्रेन्ट ड्रीप द्वारे फर्टिगेशन केले तसेच ३  फवारणी घेतल्या   या आधी पावसाळी  काळात यंदा अतिवृष्टी सदृश्य अति प्रमाणात परिसरात पाऊस झाल्याने या परिस्थिती त कंद कुज व बुरशी जन्य रोग येवू नये यासाठी जैविक व रासायनिक बुरशीनाशक व किटकनाशक चां वापर केला    हळदी पिका साठी पाणी केळी पिका सारखे लागत नाही म्हणून योग्य नियोजनातून पाण्याच्या पाळ्या दिल्या  यंदा अति पाऊस व अंती थंडी यात उत्पादकांना अगदी विपरीत परिस्थितीत उत्पन्न चांगले येईल किंवा नाही या विवंचनेत असताना राहुल नारखेडे यांनी अगदी काटेकोरपणे नियोजन केल्याने त्याचे उत्पादन अधिक चांगले आले  


    या यामुळे वर्षभरात अनेक वेळा अतिवृष्टीने जास्त पाणी होऊनही तर थंडीत कडाक्याच्या थंडीने करप्या ची शंका असतानाही हळद जमिनीत व्यवस्थित वाढ होऊन वजन धरण्यास सोयीस्कर झाले आज मितीस हळद काढून त्यास बॉयलर च्या माध्यमातून प्रक्रिया कोरडी केली जात आहे.आज या तरुण शेतकऱ्यांस   ४.२५  एकरात दर्जेदार उत्पादन या शेतकऱ्याने काढले आहे साधारणता एका एकराला 155 क्विंटल हळद ( फिंगर )  तर 40 ते 45 क्विंटल हळदीचे गट्टू (मूळ)असे  जवळपास 750 ते 800 क्विटल उत्पादन मिळाले आहे यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार झालेली योग्य मशागत व प्रत्यक्ष शेतात पाहणी करून वेळेनुसार हळदीचे चांगले उत्पन्न येण्यासाठी काय करावे लागेल याचा तज्ञांकडून अभ्यास केला व त्याप्रमाणें उत्पादन हाती आले यंदा केळी पट्ट्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी  अस्मानी सुलतानी संकट व बेभरोश्याचे भाव केळी उत्पादकांना परवडणारे नाही म्हणून पर्यायी पिक शोधत  हळदीचे तर काही शेतकऱ्यांनी आले ची  मोठ्याप्रमाणावर चिनावल कुंभारखेडा रोझोदा वडगाव विवरा लागवड केली होती मात्र यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने हळद व आले  पिकाला जास्त पाणी चालत नसल्याने उत्पन्न चांगले येईल की नाही ही धास्ती सर्व शेतकऱ्यांना असताना तरुण शेतकरी राहुल नारखेडे यांनी त्यांच्या शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार उत्पादन काढून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवल्याने परिसरात त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व त्यांनी कसे पीक घेतले यासाठी काय काय उपाय योजना केल्या व चांगले उत्पन्न मिळवण्याचे रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी शेतकरी उत्सुक दिसत आहे .



परिसरात केळीला पर्यायी पीक म्हणून हळद, आले पीक शेतकरी घेत आहे.मी सुद्धा माझा मित्र कृषी तज्ञ तुषार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे हळदीचे पीक घेतले गेल्या २ वर्षात कोरोना मुळे चांगले उत्पन्न मिळाले नाही. हळदी च्या बाजारपेठेत सांगली येथे आज मितीस बऱ्यापैकी भाव आहे त्यातच कमोडिटी मार्केट ला येत्या दोन महिन्यांत हळद ला ९००० चां भाव मिळेल असे वर्तवण्यात आल्याने केळी पट्ट्यात पर्यायी पिक लागवड केलेल्या हळद उत्पादकांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.

        राहुल नारखेडे , हळद उत्पादक शेतकरी ,चिनावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.