केळीचे अडीच हजार घड माथेफिरूंनी कापून फेकले. रावेर तालुक्यातील लोण यावलमध्ये;
केळीचे अडीच हजार घड माथेफिरूंनी कापून फेकले.
रावेर तालुक्यातील लोण यावलमध्ये;
लेवाजगत न्यूज यावल-चिनावल (ता. रावेर) शिवारात शेतातील उभे पीक कापून फेकण्याच्या घटनेचे लोण आता यावल तालुक्यात पसरू लागले आहे. येथील प्रगतशील शेतकरी किशोर देवराम राणे यांनी बटाईने केलेल्या अट्रावल रस्त्यावरील शेतात शेळ्या चारणाऱ्या सहा गुराख्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याचा राग आल्याने सहा संशयितांनी राणे यांचे शेतातील टिश्यूकल्चर जातीचे २५०० केळीचे घड कापून फेकले. यात राणे यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. किशोर राणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांनी दिनकर पुंडलिक वारके यांचे सोमवार रस्त्यावरील शेत बटाईने केले आहे. तेथे त्यांनी ३५०० खोड़ केळी लागवड केली आहे. या बागेतील २५०० केळीचे घड़ शेळ्या चारणाऱ्या गुराख्यांनी त्यांचे विरूद्ध पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मध्यरात्री कापून टाकले.
राणे यांनी अट्रावल रस्त्यावर बटाईने केलेल्या शेतात शनिवारी ( ता .१२ ) सहा गुराखी हरभरा पिकात जबरदस्तीने शेळ्या चारत होते . त्यांना हटकल्याने संशयितांनी राणे यांना मारहाण केली होती . यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला . याचा राग येऊन संशयित राजेंद्र काशीनाथ जाधव , विनोद गोविंदा खैरे , स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर , एकनाथ तोताराम भील , अनिल गंगाधर धनगर ( सर्व रा . यावल ) यांनी किशोर राणे यांना केळी कापून फेकण्याची धमकी दिली होती . ती संशयितांनी रात्रीतून खरी केली . राणे यांच्या तक्रारीवरुन राजेंद्र काशीनाथ जाधव , विनोद गोविंदा खैरे , स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर , एकनाथ तोताराम भील , अनिल गंगाधर धनगर ( सर्व रा . यावल ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत