डाऊन पवन एक्स्प्रेसचे चार डबे रूळावरून नाशिक जवळ घसरले , डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
डाऊन पवन एक्स्प्रेसचे चार डबे रूळावरून नाशिक जवळ घसरले ,डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
लेवाजगत न्यूज भुसावळ :- मुंबईहून जयनगरसाठी निघालेल्या डाऊन ११०६१ डाऊन एलटीटी - जयनगर एक्स्प्रेसचे चार डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची नाशिकजवळ घडली . रविवार , 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे . या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे . रेल्वे प्रशासनाचे अधिकारी , कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत . दरम्यान , गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून या अपघातामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक गाड्यांना आता विलंब होणार आहे .
अपघाताचे कारण अस्पष्ट
मुंबईहून जयनगरकडे निघालेली डाऊन ११०६१ पवन एक्स्प्रेसचे चार डबे लहावीट- देवळाली दरम्यान घसरले असून या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत तर या अपघामुळे अप लाईनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . भुसावळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच एआरटी टीम घटनास्थळी रवाना झाली आहे . अपघातामुळे अनेक गाड्या खोळंबणार असून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू करण्यात आला आहे .
रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत . प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 ( नाशिक ) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे . तर मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL : 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत