Header Ads

Header ADS

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के; याही वर्षी मुलीचं आघाडीवर

 बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के; याही वर्षी मुलीचं आघाडीवर

लेवाजगत न्युज:-राज्यात14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 1356604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे.

राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 90.91 टक्के इतका लागला आहे.

 

यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी 

 विद्यार्थिनींचा एकूण निकाल 95.35 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 93.29 टक्के इतका लागला आहे. एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे.  कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के लागला आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता मुलांसाठी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

www.hscresult.mkcl.org

यंदाच्या परीक्षेत राज्यभरातून 14,85,191 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8,17,188 इतकी मुले तर 6,68,003 इतक्या मुली आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.

या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका (HSC result) संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी तीन वाजेपासून वितरित करण्यात येतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.