शिरगाव येथील साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
शिरगाव येथील साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
उरण( सुनील ठाकूर).शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई मंदिराचा २० वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी साई संस्थानाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे व सचिव सपना लालचंदाणी यांच्या हस्ते साई बाबांचा महाभिषेक करून कार्यक्रमास सुरुवात झाली. दुपारी प्रकाश देवळे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसा भर साई गीत साई भजनांचा कार्यक्रमांनी परिसर मंत्रमुग्ध झाला. मंदिर गाभार्यात आकर्षक अशा फुलांची सजावट भाविकांना अधिकच आकर्षित करत होती.
संस्थांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जवळपास पाच हजारच्या वर साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमास अनिल देवकर, जयेश मुळे, राकेश मुगळे, नवरतन शर्मा, विनोद सूर्यवंशी, विष्णू कदम, ज्ञानेश्वर लिंगसे, सिद्धाजी माने, विकास पतंगे. सत्यवान शिंदे. साकेत करंजकर आदींचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत