सावदा पालिका कार्यालयात प्रभाग आरक्षण सोडत सोमवार रोजी ११ वाजता
सावदा पालिका कार्यालयात प्रभाग आरक्षण सोडत सोमवार रोजी ११ वाजता
लेवाजगत न्यूज सावदा- नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला ) , जमाती ( महिला ) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणेसाठी कार्यक्रम जाहिर करण्यात येत आहे . आरक्षण सोडत नगरपरिषद कार्यालय येथे सोमवारी सकाळी ११.०० उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचे समोर नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात येईल.
दिनांक वार सोमवार दिनांक १३/०६/२०२२ सकाळी ११.०० सावदा पालिका कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येईल त्यावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी ( हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात. बुधवार दिनांक -१५ / ०६ / २०२२ ते वार - मंगळवार दिनांक २१/०६/२०२२ ( दुपारी ३.०० वा . पर्यंत ) हरकती स्वीकारण्यात येतील असे पत्रकात नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत