Header Ads

Header ADS

सावदा सह परिसरात लावली पावसाने जोरदार हजेरी,वीज प्रवाह खंडित

 सावदा सह परिसरात लावली पावसाने जोरदार हजेरी,वीज प्रवाह खंडित

लेवाजगत न्यूज-आज दिनांक १० शुक्रवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजता शहरासह परिसरात सोसाट्याचा वाऱ्या सह पावसाने जोरदार अर्धा तास हजेरी लावली.

   सावदा शहरासह विजांचा कडकडत व जोरदार सोसाट्याचा वाऱ्याने हजेरी लावली आहे. वाऱ्या मुळे शहरातील वीजप्रवाह १ तास खंडित झाला.नंतर मोठया सरीसह  पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि दुःख ही दिसत आहे .कारण पाऊस तर आहेच पण जोरदार वारा सुद्धा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव तळ्यात मळ्यात आहे. मागील काही दिवसांपूर्वी खिरोदा सावखेडा रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार वादळ झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता ही शेतकरी चिंतेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.