Header Ads

Header ADS

सावद्यात एस टी चे स्मार्ट कार्ड सेंटर पूर्ववत सुरू करा. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक-३१ जून शेवटची तारीख

 

सावद्यात एस टी चे स्मार्ट कार्ड सेंटर पूर्ववत सुरू करा.
एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक-३०जून शेवटची तारीख

लेवाजगत न्यूज- एसटी महामंडळाचा संप सुरु होता मोजक्याच बस सुरु होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह अन्य सवलतीसाठी देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड काढण्याकडे गरजूंनी पाठ फिरवली होती. कोरोना च्या लॉक डाऊन व संप या मुळे शहरात सुरू असलेले बस स्थानका येथील स्मार्ट कार्ड सेंटर बंद करण्यात आले होते ,ते त्वरित सुरू करावे अशी मागणी येथील लेवा पाटीदार फौंडेशन तर्फे करण्यात आली आहे. 

     बस च्या सवलतीच्या स्मार्ट कार्ड ची ३०जुलै पर्यंत याची मुदत असून त्यानंतर हे कार्ड सवलत धारकांना बंधनकारक राहणार आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाच्या (MSRTC) माध्यमातून २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ (Smart Card) काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव व संपामुळे सावदा येथे सुरू असलेले स्मार्ट कार्ड सेंटर बंद करण्यात आले होते ते बस स्थानकात पूर्ववत त्वरित सुरू करावे जेणे करून कोणी सवलती पासून वंचित राहणार नाही अशी मागणी लेवा पाटीदार फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे. 

 ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य सवलत धारकांना एसटी महामंडळाने ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची प्रक्रीया सुरू केली   सावदा परिसरात  याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. मात्र, कोरोनाचा पहिला आणि दुसरा लॉकडाऊन आणि आता गेल्या  महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे या योजनेचे सेंटर येथून बंद करण्यात आले.

तर रावेर येथे सुरू आहे.जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये या साठी सावदा येथे सुरू करावे.

 बस सवलतीच्या स्मार्ट कार्डची मुदत वेळोवेळी वाढविण्यात आली. आता ३०जून २०२२ ही मुदत अंतिम असून त्यानंतर सवलत धारकांना एसटीमध्ये १जुलै पासून स्मार्टकार्ड बंधनकारक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता सध्याची प्रचलित असलेली ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यात मुभा देण्यात येत आहे. पण ही मुभा १ जुलै पासून बंद होणार असून बस मध्ये प्रवास कारताना बस सवलतीचे स्मार्ट कार्ड जवळ असल्या शिवाय सवलत मिळणार नाही .सवलती पासून  नागरिक वंचित राहू नये या साठी सावदा येथील बस स्थानकात असलेले स्मार्ट कार्ड सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी लेवा फाऊंडेशन ने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.