Header Ads

Header ADS

अखेर बिगुल वाजला : राज्यातील ९२ नगरपालिकांसह चार नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू १८ ऑगस्ट रोजी होणार मतदान : दुसऱ्या दिवशी १९ रोजी मतमोजणी

 

Akhēra-bigula-vājalā- rājyātīla-92nagarapālikānsaha cāra-nagarapan̄cāyatīnsāṭhī-ācārasanhitā-lāgū-18-ŏgasṭa--rōjī-hōṇāra-matadāna-dusaṟyā-divaśī-19--rōjī-matamōjaṇī

अखेर बिगुल वाजला : राज्यातील ९२ नगरपालिकांसह चार नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू १८ ऑगस्ट रोजी होणार मतदान : दुसऱ्या दिवशी १९ रोजी मतमोजणी

Finally , the trumpet sounded : Code of Conduct applied for four Nagar Panchayats including 92 Municipalities in the state 

वृत्त संस्था मुंबई :- राज्यात केव्हाही निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे . १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी झाली आहे . दरम्यान , आदेश आल्यानंतर ठिकठिकाणचे पालिका व पोलिस प्रशासन कामाला लागले आहेत .असा आहे निवडणूक कार्यक्रम निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे . निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील . २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरली जातील तर छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर होईल शिवाय ४ ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येतील . उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे . १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान घेतले जाणार आहे . लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी जाहीर होईल .प्रचारासाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात १४ दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे . यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे . निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रियापार पडणार आहे .

        या शहरात होतील निवडणुका

Akhēra-bigula-vājalā- rājyātīla-92nagarapālikānsaha cāra-nagarapan̄cāyatīnsāṭhī-ācārasanhitā-lāgū-18-ŏgasṭa--rōjī-hōṇāra-matadāna-dusaṟyā-divaśī-19--rōjī-matamōjaṇī





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.