मथुरेच्या बाकेबीहारी मंदीरात श्वास गुदमरून दोघांच्या मृत्यू
मथुरेच्या बाकेबीहारी मंदीरात श्वास गुदमरून दोघांच्या मृत्यू
वृत्तसंस्था मथुरा -कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेच्या बांके बिहारी मंदिरात भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री दोन वाजता वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीदरम्यान गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू झाला. ६ भाविकांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या बचाव पथकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
८०० भाविकांची क्षमता, कितीतरी पटीने जास्त भाविक पोहोचले
ठाकूर बांके बिहारी मंदिरात १२ वाजता श्री कृष्णाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर ठाकूरजींचा विशेष श्रृंगार करण्यात आला. यावेळी दरवाजे बंद करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात भाविकांची गर्दी वाढत राहिली. सकाळी १.४५ वाजता दरवाजे पुन्हा उघडले जाणार होते. यानंतर पहाटे १.५५वाजता मंगला आरती होणार होती. मंदिराच्या प्रांगणात सुमारे ८०० भाविक एकत्र येऊ शकतात. याठिकाणी कितीतरी पट जास्त भाविक पोहोचल्याचा अंदाज आहे. प्रचंड गर्दीमुळे काही भाविकांचा जीव गुदमरला.
त्यामुळे नोएडा सेक्टर ९९ येथील रहिवासी निर्मला देवी आणि वृंदावन येथील भुलेराम कॉलनी रुक्मणी विहार येथील रामप्रसाद विश्वकर्मा यांची प्रकृती खालावली. बचाव पथक त्यांना रुग्णालयात नेत होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला. राम प्रसाद हे मूळचे जबलपूरचे आहेत.
३ भाविक रुग्णालयात दाखल
मंदिरात अपघात झाला त्यावेळी डीएम, एसएसपी, महापालिका आयुक्तांसह पोलिस दल उपस्थित होते. पोलिस आणि पीएसीच्या जवानांनी बेशुद्ध झालेल्या भाविकांना मंदिरातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. भाविकांना वृंदावनच्या रामकृष्ण मिशन हॉस्पिटल, ब्रज हेल्थ केअर आणि १०० बेड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोन भाविकांना मृत घोषित केले.
सर्वात आधी ४ क्रमांकाच्या गेटवर भाविक झाले बेशुद्ध
सर्वात आधी ४ क्रमांकाच्या गेटवर भाविक झाले बेशुद्ध
बांके बिहारी मंदिरात बाहेर पडण्यासाठी २ गेट आहेत. गेट नंबर १ आणि ४.सर्वप्रथम ४ क्रमांकाच्या गेटवर एक भाविक गुदमरल्याने बेशुद्ध झाला. मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांची गर्दी वाढल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. काही भाविकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दुसरी महिला बेशुद्ध पडली. यानंतर अन्य काही भाविकांची प्रकृतीही बिघडली.
मंदिर परिसरातून काढल्यानंतर ३० मिनिटांनी आराम
अपघातानंतर रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात घेतला. एसएसपी अभिषेक यादव म्हणाले, "सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ज्यांची प्रकृती खालावली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंदिराच्या आवारातून बाहेर काढल्यानंतर ३० मिनिटांनी आराम वाटू लागलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यांना घरी पाठवून देण्यात आले आहे.
मंगला आरतीनंतर काही काळ दरवाजे बंद
मंदिराचे सेवेकरी श्रीनाथ गोस्वामी म्हणाले की, "ठाकूर बांकेबिहारी मंदिरात मंगला आरतीची परंपरा नाही. येथे ठाकूर जी बालस्वरूपात असतात आणि रात्री निधीवनात रासलिला करायला जातात. त्यामुळे त्यांना सकाळी उठवले जात नाही. जन्माष्टमीच्या दिवशी फक्त मंगला आरती होते. या दिवशी कान्हा ठाकूर रुप धारण करतात आणि रात्री भक्तांना दर्शन देतात. अपघाताच्या वेळीही पहाटे १.५५ वाजता मंगला आरती होत होती. त्यानंतर काही काळ दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात क्षमतेपेक्षा जास्त भाविक जमा झाले होते.'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत