२२वर्षीय तरुणाचा दोन अल्पवयीनांन कडून खून
२२वर्षीय तरुणाचा दोन अल्पवयीनांन कडून खून
लेवाजगत न्यूज जळगाव -सहा दिवसांपूर्वी भादली-कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयित रित्या आढळून आला हाेता. या प्रकरणी भादली येथील दोन अल्पवयीनांना पाेलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. आठवडाभरात अल्पवयीनांनी केलेली ही दुसरी हत्या असल्याने जिल्हा हादरला आहे.
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भादली- जुना कडगाव रस्त्यावर पाटचारी लागून असलेल्या शेतात एका तरुणाचा मृतदेह चिखलाने माखलेला पडलेला होता. याची माहिती भादलीच्या पोलीस पाटील राधिका ढाके यांनी दिल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला.
याप्रकरणी मृत संदेशची शेतीकाम करणारी आई छायाबाई लीलाधर आढाळे (वय ४५)यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भा.द.वी. कलम ३०२ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती.
नाशिराबाद पाेलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक अनिल मोरे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास केला असता मृत हा भादली येथील संदेश लिलाधर आढाळे (वय २२)येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर पाेलिस उपनिरिक्षक राजेंद्र सांळुके, रवींद्र इंधाटे, किरण बाविस्कर या पथकाने अधिक चौकशी केल्यावर मृताचे घटनेच्या दिवशी माेबाईलवर सर्वात शेवटी कुणाशी बोलणे झाले, याची माहिती घेतली.
यानंतर तपासाात भादली येथील दोन विधीसंघर्ष (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता मृत संदेश आढाळे हा बहिणीला त्रास देत होता.या कारणामुळे त्याला आम्ही ठार मारले असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व गुन्ह्याच्या वेळी अंगावर असणारे कपडे पाेलिसांनी जप्त केले आहे. या अल्पवयीनांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत