प्रा डॉ चव्हाण दोन पुरस्कारांनी सन्मानित
प्रा डॉ चव्हाण दोन पुरस्कारांनी सन्मानित
लेवाजगत न्यूज नाशिक-प्रा डॉ बी एल चव्हाण यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा दोन सामाजिक संस्थांनी पुढाकार देऊन सन्मान केला. यापूर्वीही राजर्षी शाहू सामाजिक व्यासपीठ, कोल्हापूर तर्फे राजर्षी शाहू युवा गौरव पुरस्कार, नाशिक येथील सामाजिक संस्थांनी दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार, दिल्लीच्या इंटरनॅशनल मित्र समूहाने आदर्श शिक्षक - संशोधक पुरस्कार देऊन प्रा डॉ चव्हाण यांना गौरविण्यात आले आहे. गतवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ आदर्श सत्यशोधक-शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
👉बातम्या करिता व्हाट्सएप गृप जॉईंट करा-
https://chat.whatsapp.com/EEtClBe8u0eBKmm4lct2jX
यावर्षी नुकताच डॉ एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन तर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 29 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला व 5 सप्टेंबर रोजी मिळाला आणि अविष्कार अचीवर्स फाउंडेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त पाच सप्टेंबर रोजी त्यांना National Dynamic Teacher Award जाहीर झाला व तो प्रदान करण्यात आला. यावर्षीच्या त्यांच्या दुहेरी सन्मानाबद्दल आजी-माजी कुलगुरु, संशोधक शास्त्रज्ञ, प्राध्यापक, स्नेही व मित्रपरिवाराने अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत