इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गेला; रात्री झोपल्यावर पाहा युवकासोबत काय झालं
इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गेला; रात्री झोपल्यावर पाहा युवकासोबत काय झालं
लेवाजगत न्युज परभणी:-घरामध्ये झोपला असताना एका २७ वर्षीय युवकाला रात्री एक वाजता सापाने चावा घेतला. त्यामुळे नातेवाईकांनी युवकाला उपचारासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे चार वाजता युवकाचा मृत्यू झाला आहे. शेख जॅकी शेख शकील असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
सेलु शहरातील राज मोहल्ला भागात राहणारा शेख जॅकी शेख शकील हा रात्री घरामध्ये झोपला असताना एक वाजता त्याला सापने चावा घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी शेख जॅकी शेख शकील याला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. या ठिकाणी साप चावल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र शेख जॅकी शेख शकील याच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. सेलू उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान सेलू उपजिल्हा रुग्णालयात अनेक लसीचा तुटवडा असल्याने रुग्णांना पुढे रेफर केले जाण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे रुग्ण व नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषध व लसीचा साठा उपलब्ध करावा अशी मागणी केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत