जळगाव येथे डॉक्टर वर हनी ट्रॅप, व्हिडिओ तयार करून मागितली खंडणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात
जळगाव येथे डॉक्टर वर हनी ट्रॅप, व्हिडिओ तयार करून मागितली खंडणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात
लेवाजगत न्यूज जळगाव- शहरातील मॅक्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. चरणसिंग जयसिंग चव्हाण (वय ४०) यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न सात जणांनी केला. यात चार महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करुन दिली.
घटना अशी की, १५ ऑक्टोबर रोजी डॉ. चव्हाण यांच्या ओळखीची महिला रुग्णालयात आली होती. यावेळी तीच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने इन्फेक्शन असल्याचे सांगत औषधी घेतल्या. या दुसऱ्या महिलेने डॉक्टरांकडे काम मागीतले होते, तसेच डॉक्टरांना मोबाईल क्रमांक दिला होता.
दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाच्या निमित्ताने फोन केला. यावेळी संबधित महिलेने डॉक्टरांना शरीरसुखाचे आमिष दिले. डॉ. चव्हाण यांनी महिलेस किती फि घ्याल याची विचारणा केली असता तीने ५ हजार रुपये ठरवले होते.
त्यानुसार सायंकाळी चार वाजता दोन महिला रुग्णालयात आल्या. यावेळी गर्दी असल्यामुळे डॉ. चव्हाण यांनी त्यांना परत पाठवून सायंकाळी ७.३० वाजता बोलावले. ठरल्यानुसार सायंकाळी रुग्णालयातील वरच्या माळ्यावरील स्पेशल रुममध्ये डॉक्टर व महिला शिरले. दुसरी महिला रुमच्या बाहेर थांबवली होती.
काही वेळाच चेतन राजेंद्र कासार व हिरामन एकनाथ जोशी हे दोघे जबरदस्तीने रुममध्ये शिरले. त्यांनी विवस्त्र अवस्थेत असलेल्या दोघांचे व्हिडीओ चित्रण केले. यांनतर महिला तेथुन निघुन गेल्या. तर दोघांनी डॉ. चव्हाण यांना मारहाण करुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पैशांची मागणी केली. यानंतर डॉक्टरांच्या कारमध्ये बसून ते निघुन गेले.
१७ ऑक्टोबर रोजी प्रदीप कोळी नावाच्या व्यक्तीचा फोन डॉ. चव्हाण यांना आला. त्याने घडलेला प्रकार मला माहिती असून ते लोक डेंजर आहेत, त्यांच्या काय डिमांड आहे, त्या पुर्ण करुन टाका असा सल्ला डॉ. चव्हाण यांना दिला. यानंतर १८ ऑक्टोबर रोजी पुन्हा पैशांची बोलणी सुरू झाली. डॉ. चव्हाण यांच्याकडून ७ लाख रुपयांची मागणी केली होती. तर ते २ लाख रुपय देण्यास तयार झाले होते. हा वाद वाढल्यामुळे अखेर महिलांसह सर्वांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी डॉ. चव्हाण यांना दिली. यानंतर १९ रोजी सायंकाळी डॉ. चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
त्यानुसार तीन महिलांसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पोलिसांनी दोन महिलांसह तीन पुरूष अशा पाच जणांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत