गौतम अदानी नंतर अनंत अंबानी यांची मातोश्री जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय चर्चेंना उधाण
गौतम अदानी नंतर अनंत अंबानी यांची मातोश्री जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय चर्चेंना उधाण
वृत्तसंस्था मुंबई-प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी ‘मातोश्री’वर पोहचले होते. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीच कारण अद्याप समोर आलं नाही आहे.
शुक्रवारी ( २१ ऑक्टोंबर ) एकीकडे मनसेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्याचवेळी रात्री ८.२० च्या सुमारास अनंत अंबानी ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. त्यानंतर ११.३० च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
यावर्षी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळाली. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात सत्तातर झाल्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यात आता अनंत अंबानी सुद्धा ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. या दोन्ही भेटीचा तपशील समोर आला नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत