Header Ads

Header ADS

हाफ मॅरेथॉन स्पर्धेद्वारा लाखो रुपयाचा गंडा घालणाराची आत्महत्या

 

Half-Marathon-Competitor-Competition-Suicide

हाफ मॅरेथॉन स्पर्धेद्वारा लाखो रुपयाचा गंडा घालणाराची आत्महत्या

वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापुरात हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असल्याची जाहिरातबाजी करीत ९०० हून अधिक स्पर्धकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. वैभव पाटील असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.


वैभव पाटील याने शाहूपुरी परिसरात एक कार्यालय थाटले होते. मराठा कमांडो सिक्युरिटी इंटेलिजेन्स मॅन पॉवर फोर्स या नावाने वेबसाईट बनवून त्यावर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती टाकली होती. स्पर्धेत सहभागी होण्याचे आमिष दाखवून देश- विदेशातील तरुणांकडून महिनाभरात प्रत्येकी अडीच हजार रुपये प्रमाणे पैसे भरून घेतले होते.

    स्पर्धेची तारीख जवळ आल्यानंतर पाटील याचा संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. असे लोक कालरात्री उशिरा एकत्र आले. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून दोघा विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसानी संशयित पूनम पाटील हिला ताब्यात घेतले होते. दरम्यान वैभवने मध्यरात्री पन्हाळा तालुक्यातील आपल्या शेतातील झाडाला फास लावून आत्महत्या केली. हि घटना आज उघडकीस आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.