दिव्यांगांकडील यूडीआयडी कार्ड प्रवास सवलतीसाठी ग्राह्य धरावे
दिव्यांगांकडील यूडीआयडी कार्ड प्रवास सवलतीसाठी ग्राह्य धरावे
लेवाजगत न्यूज भुसावळ-दिव्यांगांकडील वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) एसटी प्रवास सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशा सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. सद्य:स्थितीत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (यूडीआडी) आहे अशा लाभार्थ्यांना राज्य परिवहनच्या बसमध्ये प्रवासभाड्यात सवलत दिली जाते. मात्र, दिव्यांगांनी ओळखपत्र दाखवल्यानंतरही वाहकांद्वारे त्यांना सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. तरी विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक कर्मचारी व वाहकांना तसे सूचित करावे, असे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत