मसाका कामगार शुक्रवारी थकीत वेतनासाठी प्रांत कार्यालयावर नेणार मोर्चा
थकीत वेतनासाठी मसाका कामगार शुक्रवारी प्रांत कार्यालयावर नेणार मोर्चा
लेवाजगत न्यूज फैजपूर-जिल्ह्यातील एकमेव ४० वर्षांपासून सुरू असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना, गेल्या तीन वर्षापासून जेडीसीसी बँकेने कर्ज पुरवठा न केल्यामुळे बंद आहे. कर्मचारी पगार देणे, भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्त कामगारांची देणी अदा करणे आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे शुक्रवार सकाळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०१९ अखेर कारखान्याची कर्ज खाती एनपीएमध्ये गेली. जिल्हा बँकेने कर्ज थकीत झाल्यावर सदरील थकीत कर्ज वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता सिक्युरिटी अॅक्टखाली ताब्यात घेतलेली आहे. २० सप्टेंबर रोजी लिलावाद्वारे ६३ कोटीमध्ये कारखाना प्रकल्पाची प्लांट मशिनरी, एकूण २७.१९ हेक्टर जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची मालमत्ता विक्रीमधून येणाऱ्या रकमेतून, प्रथम कारखान्याचे कामगार वर्गाची देणी भागवली जावीत, या मागणीकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी कारखान्याचे सर्व कामगार, ७ रोज शुक्रवार सकाळी ११ वाजता फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत