Header Ads

Header ADS

फैजपूर येथीलधनाजी नाना महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरा

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे पं. इंदिरा गांधी जयंती साजरा


 फैजपूर येथीलधनाजी नाना महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरा

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे राष्ट्रीय सण उत्सव समिती व  राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी  यांची जयंती साजरा करण्यात आली. 

    तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे पदाधिकारी प्रा.एन. ई. भंगाळे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रसंगी प्राचार्य.डॉ.पी.आर चौधरी यांनी इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.एम.के.जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मारोती जाधव सूत्र संचलन राष्ट्रीय सण मोहोत्सव समिती प्रमुख डॉ.एस.एल.बिऱ्हाडे यांनी केले,  व आभार एन.एस एस. अधिकारी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी यांनी केले. प्रसंगी उपप्राचार्य.डॉ. ए.आय.भंगाळे,डॉ.एस.व्ही.जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जी.जी.कोल्हे, महाविद्यालयातील  एन.एस.एस. चे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.