महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश प्रमाणे लव जिहाद कायदा व्हावा - श्रध्दा वानकर खूनी आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी-फैजपूर येथे प्रांत कैलास कडलग यांना रावेर यावल तालुक्यातील हिंदूंचे निवेदनाद्वारे मागणी
महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश प्रमाणे लव जिहाद कायदा व्हावा -
श्रध्दा वानकर खूनी आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी-फैजपूर येथे प्रांत कैलास कडलग यांना रावेर यावल तालुक्यातील हिंदूंचे निवेदनाद्वारे मागणी
लेवाजगत न्यूज फैजपूर -श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीचा दिनांक १८.०५.२०२२ रोजी गळा आवळून व नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून अमानवी निघृण हत्याकरण्यात आली. हत्येत सहभागी असलेला आरोपी आफताब अमीन पूनावाला याने श्रध्वा हिचेशी खोटे प्रेमाचे नाटक करून प्रेम प्रकरणात गुतवून हिला दिल्ली येणेस भाग पाडले व नंतर धर्म परिवर्तन करण्याचा पयल केला परंतू श्रद्धा हिने नकार दिल्याने तिची हत्या केली.
लव्ह जिहादच्या जाळयात अडकून आज पर्यंत अनेक तरूणींची फसवणूक झाली आणि हत्या सुध्दा झाली तसेच अनेक तरुणीना आतंकवादी कारवायांमध्ये अडकविण्यात आले. असे कृत्य करणाऱ्या आरोपींवर योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदन फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना रावेर यावल तालुक्यातही हिंदू महिला,तरुण तरुणींच्या वतीने देण्यात आले.
श्रद्धा वालकर हिची हत्या करणा-या नराधम जीहादयाला भर चौकात फाशी दयावी आणि त्याच्या परिवाराला आणि त्याला सहकार्य करणा-याना सुध्दा आरोपी करावे. कोणत्याही परिस्थितीत आफताब पूनावाला या जेहाद्याला व त्याच्या परिवाराला या गुन्हयाची कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ,कायदा व सुव्यवस्थेकडून मागण्या करण्यात येत आहे.उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा लव जिहाद कायदा करण्यात यावा. घटनेच्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावा. जलदगती न्यायालयासमोर चालवून तात्काळ आरोपीस फाशीची शिक्षा दयाची. फॉरेन्सिक लॅब तज्ञांची नियुक्ती या प्रकरणाच्या तपासासाठी करावी.आरोपीस कायदयातील कलम ३०२ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा व कलम २०१ प्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा दयावी. अशा जिहादी घटना समाजात वारंवार घडत आहेत आणि त्या घडू नयेत यासाठी असे जिहादी प्रकरण समाजाच्या निदर्शनास आल्यास त्यातील संभाव्य बळी पडणा-या मुलींना समुपदेशन करण्यास आम्हांस परवानगी घ्यावी अशी मागणीही करण्यात आली.यावेळी प्रियदर्शिनी सरोदे,लीना चौधरी,राजेंद्र चौधरी, स्वप्निल पवार, पराग पाटील, अनंत नेहते
संदीप कासार,विकी भिडे, किरण साळुंखे ,लोकेश कोल्हे, गणेश सपकाळे, संजय सराफ ,अनिरुद्ध सरोदे, अनिकेत चोपडे ,राहुल वारके, वेदांत मंडवाले, सिद्धेश नेहते, एकनाथ चौधरी, देवेंद्र जोशी, योगेश्वर कोल्हे, अभय वारके, कृष्णा साळुंखे, सचिन बरहाटे, धनंजय चौधरी, राहुल चौधरी, घनश्याम महाजन, महेश अकोले, संतोष परदेशी, सर्वेश लोमटे, व्यंकटेश भिरुळ, सुनील जोगी ,मोहन बागुल, सपन परदेशी, मोहित जोगी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रवीण कोष्टी, सुरज गाजरे, महेश बेदरकर, रुपेश चोपडे,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत