Header Ads

Header ADS

जंगम मालमत्ता बखळ दाखवून खरेदी-विक्री शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा, फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सावद्याच्या उद्योजकांचा समावेश

 

जंगम मालमत्ता बखळ दाखवून खरेदी-विक्री  शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा, फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सावद्याच्या उद्योजकांचा समावेश

जंगम मालमत्ता बखळ दाखवून खरेदी-विक्री

शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा, फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सावद्याच्या उद्योजकांचा समावेश
लेवाजगत न्यूज सावदा-फैजपूर येथील एका संस्थेच्या कर्जदाराची बांधकाम झालेली जागा बखळ दाखवून खरेदी करण्यात आली. या प्रकरणात महसूल बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ७ जणांविरूद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात संशयितांमध्ये माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी,उद्योजक युगंधर पवार,कविता पवार यांचाही समावेश आहे. सावद्याचे दुय्यम निबंधक प्रशांत कुलकर्णी यांनी ही फिर्याद दिली.

   फैजपूर नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक १४४४ मधील प्लॉट क्रमांक ६ व ११ या मालमत्तेशी निगडीत हे व्यवहार आहेत. ही मालमत्ता फैजपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने कर्जदार युवराज सुदाम तळेले (रा.फैजपूर) यांचेकडे कर्ज थकबाकी असल्याने संस्थेमार्फत लिलाव करुन प्राप्त केली होती. या मालमत्तेवर बांधकाम झालेले असताना देखील ती बखळ असल्याचे दर्शवून संशयितांनी तिच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. त्यात शासनाचा महसूल बुडवून नुकसान केले, अशी फिर्याद दुय्यम निबंधकांनी दिली. त्यानुसार फैजपूर विकासो लिमिटेड ठेव संकलन कर्जवाटप विभाग लि. फैजपूरतर्फे शासनमान्य विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील, चेअरमन सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आमोदे तर्फे अनिल विनायक पाटील (रा.आमोदे), जितेंद्र प्रकाश पवार (मृत, रा.सावदा), पवार यांचे वारस अनुक्रमे कविता जितेंद्र पवार, युगंधर जितेंद्र पवार दोघे (रा.सावदा), अमिता हेमराज चौधरी (रा.फैजपूर), नितीन चंद्रकांत पाटील (रा.फैजपूर) यांचेवर गुन्हा दाखल झाला. संबंधितांनी सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ८ जुलै २०१३, ७ मार्च २०१९ आणि १७ जानेवारी २०२२ रोजी बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवला. एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनवर तडवी, संजय चौधरी व उमेश पाटील हे तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.