जिल्हा दूध संघात नाथाभाऊंची बाजी : सावड्याचे जगदीश बढे बिनविरोध
जिल्हा दूध संघात नाथाभाऊंची बाजी : सावद्याचे जगदीश बढे बिनविरोध
लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत आज छाननी नंतर रावेरमधून एकनाथराव खडसे यांच्या समर्थकाचा बिनविरोध विजय झाला आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाच्या निवडणुकीसाठी आज छाननीचा शेवटचा दिवस होता. यातून विविध मतदारसंघासाठींच्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत. यात रावेर मतदारसंघातून सावदा येथील जगदीश लहू बढे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनी निवड निश्चीत झाली आहे. ते आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असून ते आधीच्या संचालक मंडळातही निवडून आले होते. या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले विजयाचे खाते उघडले आहे.
आज छाननीच्या नंतर दुध संघातील लढतींचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. छाननी नंतर निवडणुकीच्या रिंगणात एकूण ११४ उमेदवार रिंगणात असून यात एरंडोल मधून एका उमेदवाराने आजच माघार घेतली आहे. अर्थात, आज सायंकाळपर्यंत निवडणुकीच्या आखाड्यात ११३ उमेदवार बाकी राहिले आहेत. आता माघारीच्या कालावधीत काही उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतरच खरेच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणुकीतील पहिली बाजी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसने व अर्थातच एकनाथराव खडसे यांनी मारल्याचे दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत