अजिवली येथे न भूतो न भविष्यती ..तपपूर्ती सोहळा अखंड हरीनाम उत्सव भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या चे आयोजन
अजिवली येथे न भूतो न भविष्यती ..तपपूर्ती सोहळा
अखंड हरीनाम उत्सव
भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या चे आयोजन
उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर ):- श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजिवली पनवेल परिसर यांच्या वतीने अजिवली येथील मैदान जुना मुंबई पुणे हायवे लगत बुधवार दिनांक 21 /12/2022 ते गुरुवार दिनांक 29/12/2022 या काळावधीत न भूतो न भविष्यती तप पूर्ती सोहळा ,अखंड हरिनाम उत्सव,ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.शांतीब्रम्ह एकनाथजी महाराज कोष्टी (आळंदीं देवाची ).व्यासपीठ नेतृत्वा खाली भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळा काळावधीत पहाटे 4ते 6 काकड आरती ,सकाळी 8ते 12 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 2 ते 5 रामायण कथा सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्रो 9 ते 11 हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत .तर बुधवार दिनांक 21/12/2022 ते मंगळ वार दिनांक 27/12/2022 दुपारी 2 ते 5 गुरुवर्य ह.भ.प.रामरावंजी महाराज ढोक (नागपूर) रामायण कथा पार पडणार आहे.
याखेरीज दिनांक 21/12/2022 रोजी रात्रो 9 ते 11 ह.भ.प.संजय महाराज पाचपोर (अकोला),गुरुवार दिनांक 22/12/2022 रात्रो 9 ते 11 ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (कोल्हापूर),शुक्रवार दिनांक 23/12/2022 रात्रो 9 ते 11 ह.भ.प.ड्रॉ.जयवंत महाराज बोधले (पंढरपूर),शनिवार दिनांक 24/12/2022 रात्रो 9ते 11ह्.भ.प.समाधान महाराज शर्मा (नगर ) ,रविवार दिनांक 25/12/2022 रात्रो 9 ते 11 ह.भ.प.महादेव महाराज राऊत (बीड ). सोमवार दिनांक 26/12/2022 रात्रो 9ते 11 ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरी).मंगळवार दिनांक 27/12/2022 रात्रौ 9 ते 11 ह.भ.प.सुरेश महाराज साठे (पुणे).बुधवार दिनांक 28/12/2022 रात्रो 9 ते 11महन्त् न्यायाचार्य ह.भ.प.नामदेव महारज शास्त्री (बीड भगवानगड).यांच्या सुश्राव्य हरिकीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तर सोहळ्याची सांगता गुरुवार दिनांक 29/12/2022 रोजी दुपारी 10 ते 12 ह्.भ.प.पांडुरंग महाराज गिरी (वावीकर ,सिन्नर,नाशिक ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे। तरी सर्व भाविकानी न् भुतो न भविष्यती अशा सोहळ्या त उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमांचा अस्वाद घेण्याचे आवाहन श्री संत ज्ञानेश्वरी माऊली सेवा मंडळ अजिवली च्या वतीने अध्यक्ष ह.भ.प.परशुराम माळी. उपाध्यक्ष श्री रमेश माळी, कार्याध्यक्ष ह.भ.प.विष्णू भोईर .खजिनदार ह.भ.प.चंद्रकांत गोजे ,सह खजिनदार श्री कृष्णा भोपी ,संपर्क प्रमुख श्री अरुण पाटील ,ह.भ.प.सदाशिव गोजे यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत