Header Ads

Header ADS

सोनसाखळीचे पैसे टाळण्यासाठी सोनाराचा खून

Alibag-incident-of-gold-chain-murder-of-goldsmith-to-avoid-money


 सोनसाखळीचे पैसे टाळण्यासाठी सोनाराचा खून

 वृत्तसंस्था अलिबाग-सोनाराकडून उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून त्याने मित्रांच्या साह्याने सोनाराचाच काटा काढला. हा खून नसून अपघात असल्याचा बनावही रचला. पण रायगड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपींना जेरबंद बंद केले.  

१९ डिसेंबर सोमवार आणि एकादशीचा योग,कोणती कराल पूजाविधी


कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे व्यवसायिक हरीश ऊर्फ हरिसिंग माधोसिंग राजपूत हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नेरळ पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिसांनी शोध घेतला असता जिते गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आला होता. त्यांची मोटर सायकल अपघातग्रस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरावर धारधार हत्यारांनी वार केल्याचे दिसून आले होते. यानंतर याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०२२ रोजी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

     गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,  उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पाचारण केले. यानंतर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे आणि त्यांच्या पथकांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

      घटनास्थळाजवळील मोबाइल सीडीआर डेटा तपासण्यात आला. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. तपास कौशल्याचा वापर करून जनार्दन कराळे आणि रोशन धुळे या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली.

      सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी हिस्का दाखवल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. विरार येथील अन्य चार आरोपींच्या मदतीने सोनाराचा काटा काढल्याचे कबूल केले. यानंतर सनी मनमोहन गिरी, सूरज दीपक जाधव, तानाजी बाबुराव चौगुले आणि धगनराम भिमारामजी पटेल यांना विरार आणि सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून तसेच सोनाराला लुटण्याच्या उद्देशाने जनार्दन कराळे यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ३६ तासांच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.   तपासात पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, राजेंद्र तेंडुलकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, श्रीकांद काळे, साहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, प्रशांत दबडे, राकेश म्हात्रे, नेरळ पोलीस ठाण्याचे गणेश गिरी, शकद फरांदे, नीलेश वाणी, घनशाम पालवे, भाऊ आघाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.