कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी... डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार
कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी... डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार
लेवाजगत न्यूज सिंगापूर ता. पुरंदर जी पुणे- लोककल्याणासाठी अथवा भगवंत प्राप्तीसाठी केलेले निष्काम कर्म ,सत्वगुणी कर्म हे सात्विक कर्म असते व ते सात्विक कर्ता करीत असतो. मोहाने, हिंसेने केलेले कर्म हे स्वार्थयुक्त असून ते जगाला तापदायक, वेदना देणारे असते .ते तामसकर्म असून त्याचा कर्ता तमोगुणी असतो .जे कर्म सफल होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलि जाते ते कर्मपूर्ण न झाल्यास दुःखी होतो ते रजोगुणीकर्म असते व ते कर्म रजोगुणी कर्ता करीत असतो . सत्वगुण, तामसगुण व रजोगुण समजण्यासाठी अध्यात्मिक सत्संग महत्वाचा आहे.
सात्विक व्यक्तीच धर्मपालन, धर्मधारण करू शकते. ह्यासाठी माझा धर्म काय आहे,माझे कर्म कसे असावे हाच गितेतील महत्वाचा मंत्र आहे . धर्मकर्म समजण्यासाठी, धर्माची धारणा होण्यासाठीअध्यात्मविद्या आत्मसात करणे महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. सिंगापूर पुरंदर येथे अखंड हरिनाम सप्ताहात त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. अठ्ठावीस वर्षेपासून येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहात डॉ रविंद्र भोळे यांनी प्रवचनाद्वरे प्रबोधन व व्यसनमुक्तीचे कार्य केले आहे.ह्या वेळी मार्गदर्शन करताना ह. भ. प. डॉ रविंद्र भोळे महाराज म्हणाले की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने वेदना विरहित जीवन जगण्यासाठी चा प्रवास व मृत्यूनंतर चा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अध्यात्मज्ञान महत्वपूर्ण असते.ह्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन वै. ह.भ. प. दत्तात्रय हरिभाऊ लवांडे अण्णा व कै शंकरराव उरसळ यांच्या प्रेरणतून तसेच श्री मोहनदादा उरसळ यांचे मार्गदर्शाखाली करण्यात येते. ह्या वेळी अठ्ठावीस वर्षे निरंतर प्रवचन सेवा केल्याबद्दल जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार,अपंगसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचा स्मृतीचिन्हं देउन सन्मान करण्यात आला. ह्या प्रसंगी पंचक्रोशीतील गावकरी भजनी मंडळे, भाविक भक्त उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत