Header Ads

Header ADS

न्हावी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काँग्रेस ने पाठिंबा दिलेले उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे विजयी

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काँग्रेस ने पाठिंबा दिलेले  उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे विजयी

न्हावी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काँग्रेस ने पाठिंबा दिलेले  उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे विजयी 

लेवाजगत न्यूज न्हावी- तालुका यावल येथील २८ नोव्हेंबर पासून चर्चेत असलेली न्हावी ग्रामपंचायत्तीमध्ये लोकनियुक्त सरपंचांसाठी चूरशीची लढत होऊन, न्हावी गावचे २० सरपंच होऊन गेले असून २१व्या शतकातील २१ वे सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काँग्रेस ने पाठिंबा दिलेले उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे हे त्यांचे प्रतिस्पर्धी नितीन नारायण चौधरी यांचा २३५८ मतांनी पराभव करून ४८३५ मते घेऊन विजयी झाले.

       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस ने पाठिंबा दिलेले( देवेंद्र चोपडे) यांच्या गटाचे  ११ उमेदवार तर बिजेपी चे नितीन नारायण चौधरी यांच्या गटाचे ६ उमेदवार निवडून आले. जनतेने काही जुन्या तर काही नवख्या व तरुणांना निवडून दिले. निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या गटाने गावातून मिरवणूक काढून जनतेचे आशीर्वाद घेतले.


    याशिवाय सदस्यांमध्ये अनुक्रमे चेतन आनंदा इंगळे ५८६, नितीन चिंधू इंगळे ५७४, योगिता‎ सचिन इंगळे ४०९, रवींद्र रमेश‎ तायडे ३५९, प्रभाकर पंडीत कोळी‎ ८२१, सविता गिरीश गाजरे ४२६,‎ मयूर सुनील चौधरी ६४९, हेमांगी‎ चेतन झोपे ३९५, आरजू सरफराज‎ तडवी ५३०, यशवंत माधव तळेले‎ ४६२, रूपाली विश्वनाथ तायडे‎ ५८०, पौर्णिमा सुधाकर पाटील ६६४,‎ शेख गफ्फार शेख याकूब पिंजारी‎ ६९४, शेख नदीम शेख अय्युब‎ पिंजारी १२७३, फातेमाबी रज्जाक‎ तडवी (बिनविरोध) हे विजयी‎ झाले. गावातील मतदारांचा कौल‎ मान्य आहे. यापुढे देखील जनसेवा,‎ सामाजिक कामे सुरू राहतील असे‎ नितीन चौधरी यांनी सांगितले.‎ दरम्यान, संपूर्ण निकाल घोषित‎ झाल्यानंतर गावातील विजयी‎ सदस्य व लोकनियुक्त सरपंच‎ समर्थकांनी एकच जल्लोष केला.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.