पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी याने प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी व भारताबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा; भाजपा चोपडा तर्फे खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध
पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी याने प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी व भारताबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा; भाजपा चोपडा तर्फे खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध
लेवाजगत न्युज चोपडा:-
भारताचे लोकप्रिय, यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या व भारताबद्दल पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी याने केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका यांच्यावतीने खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात चोपडा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी याचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री.राकेश पाटील, तालुका सरचिटणीस श्री.हनुमंत महाजन, शहराध्यक्ष श्री.गजेंद्र जैस्वाल, भाजयूमो तालुकाध्यक्ष श्री.प्रकाश पाटील, श्री.हिम्मतराव पाटील, श्री.सागर चौधरी, श्री.संदिप चौहन श्री.कांतीलाल पाटील, श्री.बापूराव पाटील, श्री.संजय श्रावणी, श्री.लक्ष्मण पाटील, श्री.रवींद्र पाटील, श्री.विजू बाविस्कर, श्री.अमित तडवी, श्री.पिंटू पावरा, श्री.गोविंद सैनदाने, श्री.विशाल भावसार, श्री.विशाल भोई यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत