पोलीस वसाहतीत दक्षता नगरात पोलिसांच्या घरावर दगडफेक
पोलीस वसाहतीत दक्षता नगरात पोलिसांच्या घरावर दगडफेक
लेवाजगत न्यूज जळगाव -पाेलिस वसाहत असलेल्या दक्षतानगरात दाेन टारगटांनी पाेलिसाच्या घरावर दगडफेक केली. तर दुसऱ्या एका घटनेत पाेलिसाला खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी दाेन पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दक्षतानगरातील बिल्डिंग क्रमांक चारच्या रूम नंबर चारमध्ये राहणारे चंद्रशेखर सुरंगे यांच्या घरावर दाेन अनाेळखी व्यक्तींनी बुधवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजता दगड फेकून मारला. त्यात त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटून दुखापत झाली. जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर शहर पाेलिस ठाण्यात हेडकाॅन्स्टेबल म्हणून कार्यरत संजय श्रीधर झाल्टे यांना विलास हेमलाल साेनवणे (रा. वाल्मीकनगर) याने पाेलिस ठाण्यात येऊन यापूर्वी तुझ्याविरुद्ध केलेल्या खाेट्या तक्रारीने त्रास व्हावा म्हणून माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला हाेता. तरी तुझी जिरलेली नाही. आता पुन्हा वरिष्ठांकडे अर्ज करून तू नाेकरी कशी करताे, असे म्हणून शिवीगाळ केल्याची तक्रार झाल्टे यांनी दिल्यावरून विलास साेनवणे विरुद्ध अदखलपात्र तक्रारीची नाेंद झाली. तपास उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत