भुसावळ तालुक्यातील प्रथम महिला साइकिलिस्ट ठरल्या प्रिया पाटील
भुसावळ तालुक्यातील प्रथम महिला साइकिलिस्ट ठरल्या प्रिया पाटील
लेवाजगत न्यूज भुसावळ- येथील सेंट्रल रेल्वे स्कूल च्या शिक्षिका सौ प्रिया रवी पाटील यांनी २४ डिसेंबर रोजी जळगांव येथे संपन्न झालेल्या BRM सायकलींग स्पर्धेत १२ तासात २०० किलोमीटर चे अंतर वेळेत पूर्ण केले.या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धक ३०० किलोमीटर,
४ स्पर्धक २००किलोमीटर या स्पर्धकांनी यशस्वी पणे दिलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण केली.
जळगाव येथून २४ डिसेंबरला ला सकाळी ६ वाजता आकाशवाणी चौक येथून BRM स्पर्धेस सुरुवात झाली .जळगांव ते भोकर परत रिटर्न जळगांव,जळगांव ते घोडसगाव आणि रिटर्न असे असे २०० किलोमीटर चे अंतर १२ तासात प्रिया रवी पाटील यांनी पूर्ण केली.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .त्या लेवापाटीदार समाजातील भुसावळ येथील पहिल्या सायकलिष्ठ ठरल्या आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत